अर्जुन नलवडे, पुढारी ऑनलाईन : देवमाणूस ही मराठी मालिकेतील अभिनेता किरण गायकवाडने देविसिंगची वठवलेली भूमिका ही प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात बऱ्यापैकी यशस्वी झाली आहे. एका सत्य घटनेवर आधारित सीरियल किलरची कथा छोट्या पडद्यावर पाहायला बरी वाटते. पण, यापेक्षाही भयानक एक सीरियल किलर असणारा देवमाणूस म्हणजे एक डाॅक्टर इंग्लंडमध्ये (Dr. Death) होऊन गेला. त्याला 'द एंजेल ऑफ डेथ' आणि 'डाॅक्टर डेथ' (Dr. Death) या नावानेही ओळखलं जात होतं. ज्याने रुग्ण म्हणून आलेल्या तब्बल २५० रुग्णांची हत्या केली होती. त्यामध्ये बहुतांशी महिलाच होत्या. अशा महाभयानक डाॅक्टररुपी देवमाणसाबद्दल जाणून घेऊ…
या सीरियल किलरचं नाव आहे हेराॅल्ड शिपमन. याचा जन्म १४ जानेवारी १९४६ इंग्लंडमधील नाॅटिघममध्ये झाला होता. त्याने १९७० मध्ये डाॅक्टरीची प्रॅक्टीस सुरू केली. त्याच्या आईला फुफ्फुसाचा कर्करोग झाला होता. त्यातच त्याची आईचं निधन झालं. त्याचा मोठा धक्का हेराॅल्ड शिपमनला लागला. त्यातून तो सीरियल किलर झाला.
हेराॅल्डने ८० च्या दशकात त्याच्या दवाखान्यात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाची हत्या करू लागला. तो ज्या पद्धतीने रुग्णाची हत्या करायचा, त्याच्यावरून रुग्णाचा मृत्यू कशाने झाला आहे, हे लक्षात येत नव्हतं. खरं तर हेराॅल्ड त्याच्याकडे येणाऱ्या रुग्णांना अफीमचा ओव्हर डोस द्यायचा. त्यातून रुग्णाचा मृत्यू व्हायचा. त्यामुळे रुग्णाचा मृत्यू कशाने झाला, हे कुणाच्या लक्षातच येत नव्हतं.
असं सांगितलं जातं की, हेराॅल्डने तोपर्यंत २५० रुग्णांची हत्या केली होती. त्यात सर्रास महिलाच होत्या. विशेष बाब अशी की, हा डाॅक्टर हत्या केलेल्या रुग्णाच्या अंत्ययात्रेत सहभागी होत होता. २४ जून १९९८ ला ८१ वर्षांच्या एका महिलेच्या हत्येनंतर त्यांचा हा हत्याकांड लोकांच्या लक्षात आला. आणि जगासमोर हा महाभयानक सीरियल किलर आला.
पोलिसांच्या तपासात हेराॅल्ड शिपमनने (Dr. Death) केलेलं हत्याकांड लक्षात आलं. त्यानं केलेलं मोठा गुन्हा पोलिसांनी कोर्टासमोर सादर केले. त्यानंतर त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली. १३ जानेवारी २००४ रोजी हेराॅल्डने तुरुंगातच फाशी घेऊन आत्महत्या केली.
पहा व्हिडीओ : कोल्हापुरात आदिमानवाच्या अस्तित्वाचे पुरावे…
हे ही वाचलंत का?