Gold Price Today | सोने, चांदी दरात पुन्हा वाढ, जाणून घ्या आजचे दर | पुढारी

Gold Price Today | सोने, चांदी दरात पुन्हा वाढ, जाणून घ्या आजचे दर

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऐन लग्नसराईत सोने- चांदी दरात पुन्हा वाढ होताना दिसत आहे. बुधवारी (दि.२४) सराफा बाजारात शुद्ध सोने म्हणजे २४ कॅरेट सोन्याच्या दरात ६२१ रुपयांची वाढ होऊन प्रति १० ग्रॅम दर ७२,२१९ रुपयांवर पोहोचला. चांदीचा दरही प्रति किलो ८०,८०० रुपयांवर पोहोचला. (Gold Price Today)

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, आज २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ७२,२१९ रुपये, २२ कॅरेट ६६,१५३ रुपये, १८ कॅरेट ५४,१६४ रुपये, १४ कॅरेट ४२,२४८ रुपयांवर खुला झाला. तर चांदीचा दर प्रति किलो ८०,८०० रुपयांवर खुला झाला.

सोने आणखी महागणार

१९ एप्रिल रोजी सोन्याने प्रति १० ग्रॅम ७३,५९६ रुपयांचा नवा उच्चांक नोंदवला होता. त्यानंतर मंगळवारी सोन्याचा दर ७१,५९८ रुपयांवर आला होता. पण आज पुन्हा सोन्याच्या दरात वाढ झाली. लग्नसराईमुळे पुढील काही दिवसांत सोने आणखी महाग होणार असल्याची शक्यता सराफा बाजारातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

शुद्ध सोन्याची पारख कशी कराल?

सराफा बाजारात २४ कॅरेट हे शुद्ध सोने मानले जाते. पण, दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर होतो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते. दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे नमूद केलेले असते. (Gold Price Today)

Back to top button