“माझ्या 90 सेकंदांच्या भाषणामुळे…” : PM मोदींचा काँग्रेससह ‘इंडिया’ आघाडीवर हल्‍लाबोल | पुढारी

"माझ्या 90 सेकंदांच्या भाषणामुळे…" : PM मोदींचा काँग्रेससह 'इंडिया' आघाडीवर हल्‍लाबोल

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : दोन दिवसांपूर्वीच राजस्थानमधील माझ्‍या ९० सेकंदांच्या भाषणात देशासमोर मी काही सत्ये मांडली होती. त्यामुळे संपूर्ण काँग्रेस आणि इंडिया आघाडीत खळबळ उडाली आहे. काँग्रेसची कुचंबणा होत असल्याचे सत्य मी देशासमोर ठेवले होते. तुमची संपत्ती हिसकावण्याचा आणि त्यांच्या खास लोकांना वाटून घेण्याचा कट रचला गेला आहे, अशा शब्‍दांमध्‍ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेससह इंडिया आघाडीवर हल्‍लाबोल केला. आज (दि.२३) राजस्‍थानमधील जाहीर सभेत त्‍यांनी काँग्रेसला महिलांचे मंगळसूत्र हिसकावून घ्यायचे आहे” या वक्तव्याचा पुनरुच्चार केला.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्‍हणाले की, २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत देशातील जनतेने भाजपला दिल्‍लीत सेवा कर्‍याची संधी दिली. त्यानंतर देशाने असे निर्णय घेतले की ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल; पण विचार करा, २०१४ नंतरही आणि आजही दिल्लीत काँग्रेसचे सरकार असते तर काय झाले असते. काँग्रेस असते तर? आजही जम्मू-काश्मीरमध्ये आमच्या सैन्यावर दगडफेक झाली असती, आमच्या जवानांसाठी ना वन रँक वन पेन्शन लागू झाली असती. आमच्या माजी सैनिकांना 1 लाख कोटी रुपये मिळाले आहेत, असेही त्‍यांनी सांगितले.

काँग्रेसची विचारसरणी नेहमीच व्होट बँकेच्या राजकारणाची राहिली आहे. २००४ मध्ये केंद्रात काँग्रेसचे सरकार स्थापन होताच, त्‍यांनी आंध्र प्रदेशातील अनुसूचित जाती-जमातीचे आरक्षण कमी करुन मुस्लिमांना आरक्षण दिले होते. हा एक प्रायोगिक प्रयोग होता. ज्याचा काँग्रेसला संपूर्ण प्रयत्न करायचा होता. 2004 ते 2010 या काळात काँग्रेसने आंध्र प्रदेशात चार वेळा मुस्लिम आरक्षण लागू करण्याचा प्रयत्न केला, परंतु कायदेशीर अडथळे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या जागरूकतेमुळे ते आपल्या योजना पूर्ण करू शकले नाहीत, असेही मोदी म्‍हणाले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलित, मागासवर्गीय आणि आदिवासींना आरक्षणाचा अधिकार दिला, तो काँग्रेस आणि इंडिया आघाडीला धर्माच्या आधारे मुस्लिमांना द्यायचा होता. काँग्रेसचे हे कारस्थान यशस्‍वी होणार नाही. दलित, मागासवर्गीय आणि आदिवासींचे आरक्षण संपुष्टात येणार नाही. आरक्षण धर्माच्या नावावर विभागले जाणार नाही, अशी ग्‍वाहीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी दिली.

“My 90-sec speech created panic in entire Congress and INDIA bloc”: PM Modi

Read @ANI Story | https://t.co/fGilNuvzKf#PMModi #Rajasthan #Loksabhaelections2024 #Congress pic.twitter.com/3aNzK4lFJi— ANI Digital (@ani_digital) April 23, 2024

Back to top button