परभणी : जिंतूर येथून पोहरागड एसटी बससेवा सुरू | पुढारी

परभणी : जिंतूर येथून पोहरागड एसटी बससेवा सुरू

जिंतूर; पुढारी वृत्तसेवा : राज्यासह अखंड देशातील बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेले पोहरागड येथे जाण्यासाठी जिंतूर आगारातून भाविकांसाठी एसटी बससेवा सुरू व्हावी, अशी अनेक वर्षांपासून बंजारा समाजाची मागणी होती. आमदार मेघना बोर्डीकर यांच्यासह स्थानिक नागरिकांच्या पाठपुराव्यामुळे अखेर या मागणीला यश आले. जिंतूर येथील स्थानिक आगारातून आजपासून (दि.२२) एसटी बससेवा सुरू करण्यात आली.

जिंतूर तालुक्यातुन हिंगोली, पुसद मार्गे पोहरागड बससेवा सुरू झाली असून ही एसटी बस जिंतूर येथून दुपारी १ वाजता निघणार असून सायंकाळी ६ वाजता पोहचेल. त्यानंतर सकाळी ही बस परत सकाळी ६ वाजता जिंतूरकडे निघेल. जिंतूरच्या स्थानिक आगारमधून बस सुरू व्हावी, यासाठी आमदार मेघना बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप तालुका अध्यक्ष अॅड विनोद राठोड, नितीन चव्हाण, ऋषीकेश घुगे, बंटी जाधव, पृथ्वीराज घुगे यांच्यासह  स्थानिक नागरिकांनी लेखी स्वरुपात आगार प्रमुख जवळेकर यांना निवेदन दिले होते. याची दखल घेऊन अखेर बससेवा सुरू करण्यात आली. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. यावेळी आगार व्यवस्थापक जवळेकरांनी चालक गुलाब राठोड व वाहक अंकुश चव्हाण यांचा सत्कार केला.

Back to top button