परभणी : ताडकळस येथे टेम्पो-मोटरसायकलची समोरासमोर धडक; एक ठार | पुढारी

परभणी : ताडकळस येथे टेम्पो-मोटरसायकलची समोरासमोर धडक; एक ठार

ताडकळस; पुढारी वृत्तसेवा : मोटरसायकल व टेम्पोची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला. तर एक गंभीर जखमी आहे. हा अपघात ताडकळस ते पालम राज्य महामार्गावर गुरूवारी (दि.१६) ५ च्या सुमारास घडला. सय्यद मुद्दस्तीर सय्यद जुल्फिकार (वय २५ रा. पालम) असे मृताचे नाव आहे.

ताडकळस पासून एक किलोमीटर अंतरावर ताडकळस ते पालम राज्य महामार्गावर आणि टेम्पो (क्र.Mh13AX8069) आणि मोटरसायकल (क्र. MH 22 AX9313) यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात मोटरसायकलस्वार सय्यद मुद्दस्तीर याचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्या मोटरसायकलवरील हबिब अली हा तरूण (वय २८) गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच ताडकळस पोलिसांनी घटनास्थळी धाव पंचनामा केला. जखमीला परभणी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आहे.

हेही वाचा :

Back to top button