सोनी राजदान-दिव्या खोसला-प्रेरणा अरोरा एकत्र, ‘हिरो हिरोईन’च्या शूटिंगला करणार सुरुवात | पुढारी

सोनी राजदान-दिव्या खोसला-प्रेरणा अरोरा एकत्र, 'हिरो हिरोईन'च्या शूटिंगला करणार सुरुवात

पुढारी ऑनलाईन डेस्क : सोनी राजदान आणि दिव्या खोसला 10 जूनपासून प्रेरणा अरोरा हिरो हिरोईनच्या शूटिंगला सुरुवात करणार आहेत. प्रेरणा व्ही अरोराचा आगामी चित्रपट ‘हीरो हिरोईन’ शूटिंगसाठी सज्ज आहे. 10 जून रोजी हैदराबाद येथे चित्रपटाच्या शूटिंग ला सुरुवात होणार आहे.

रामोजी फिल्म सिटी इथे चित्रपटाचे शूट होणार आहे. चित्रपटात आऊटडोअर आणि इनडोअर अशा एकूण 35 लोकेशन्स असून बिहारची पार्श्वभूमी दर्शविणारा सेट बनवला जात आहे असं देखील कळतंय. हैदराबादमध्ये हे खास शूट होणार असल्याने कलाकार आणि निर्माती देखील या साठी उत्सुक आहे.

Back to top button