दिनेश त्रिपाठी भारतीय नौदलाचे नवे प्रमुख, महिना अखेरीस स्वीकारणार पदभार | पुढारी

दिनेश त्रिपाठी भारतीय नौदलाचे नवे प्रमुख, महिना अखेरीस स्वीकारणार पदभार

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : भारत सरकारने नौदलाचे प्रमुख म्हणून दिनेश त्रिपाठी यांची नियुक्ती केली. ते सध्या नोदलाचे उपप्रमुख आहेत. दिनेश त्रिपाठी नौदलाचे प्रमुख म्हणून महिना अखेरीस ३० एप्रिलला पदभार स्वीकारणार आहेत. केंद्र सरकारने गुरुवारी (१८ एप्रिल) रात्री उशिरा त्यांच्या नियुक्तीची घोषणा केली.

दिनेश त्रिपाठी मागच्या ४० वर्षांपासून नौदलात कार्यरत आहेत. त्यांच्या या प्रदिर्घ कारकिर्दीत त्यांनी अनेक महत्वाच्या कामगिरी आणि जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. सध्या ते नौदलाचे उपप्रमुख असून यापूर्वी ते पश्चिम नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ होते.

दिनेश त्रिपाठी सैनिक शाळा, रेवा आणि नॅशनल डिफेन्स अकॅडमी, खडकवासलाचे माजी विद्यार्थी आहेत. १ जुलै १९८५ मध्ये भारतीय नौदलात त्यांची नियुक्ती झाली. नवे नौदल प्रमुख दिनेश त्रिपाठी दळणवळण आणि इलेक्ट्रॉनिक युद्ध विशेषज्ञ आहेत. त्यांनी नौदलाच्या कारकिर्दीत विनाश, किर्च आणि त्रिशूल सारख्या जहाजांचे नेतृत्व केले. यासोबतच त्यांनी महत्वाच्या ऑपरेशनल आणि स्टाफच्या नियुक्त्याही केल्या आहेत. यात फ्लीट ऑपरेशन्स अधिकारी, मुंबईतील वेस्टर्न फ्लीट, नेव्हल ऑपरेशनल डायरेक्टर, मुंबईतील नेटवर्क सेंट्रीक ऑपरेशन्सचे प्रमुख डायरेक्टर आणि नवी दिल्लीतील प्रमुख डायरेक्टर नेव्हल प्लॅन्स यांचा समावेश आहे.

दिनेश त्रिपाठी यांनी नौदलात सांभाळलेली महत्वाची पदे

  • रिअर ऍडमिरल म्हणून राष्ट्रीय मुख्यालयात सहाय्यक नौदल प्रमुख आणि ईस्टर्न फ्लीट कमांडिंग फ्लॅग ऑफिसर
  • जून २०१९ मध्ये व्हाइस ऍडमिरल पदावर बढती
  • केरळमधील एझिमाला येथे भारतीय नौदल अकादमीच्या कमांडंट
  • जुलै २०२० ते मे २०२१ पर्यंत नौदल ऑपरेशन्सचे महासंचालक
  • जून २०२१ ते फेब्रुवारी २०२३ पर्यंत कार्मिक प्रमुख
  • ४ जानेवारी २०२४ रोजी नौदल उपप्रमुखपदी नियुक्ती
  • १८ एप्रिल २०२४ नौदल प्रमुख म्हणून घोषणा, ३० एप्रिलला कार्यभार स्वीकारणार

Back to top button