Stock Market Updates | सलग ३ सत्रांतील घसरणीनंतर सेन्सेक्स, निफ्टी तेजीत | पुढारी

Stock Market Updates | सलग ३ सत्रांतील घसरणीनंतर सेन्सेक्स, निफ्टी तेजीत

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय शेअर बाजारात सलग ३ सत्रांतील विक्रीनंतर गुरुवारी खरेदी दिसून आली. गेल्या तीन सत्रांत बाजारात सुमारे ३ टक्क्यांनी घसरण झाली होती. पण आज गुरुवारी शेअर बाजाराने तेजीत सुरुवात केली. सेन्सेक्स आज ७३,१८३ वर खुला झाला. त्यानंतर त्यात चढ-उतार दिसून आला. सकाळच्या व्यवहाराच्या अखेरीस सेन्सेक्स ३५० अंकांनी वाढून ७३,३०० वर गेला. तर निफ्टी २२,२५० च्या पातळीवर व्यवहार करत आहे. (Stock Market Updates)

‘हे’ शेअर्स तेजीत

सेन्सेक्सवर पॉवर ग्रिड, एम अँड एम, भारती एअरटेल, टाटा स्टील, एलटी, टीसीएस जेएसडब्ल्यू स्टील, इन्फोसिस हे शेअर्स सर्वाधिक तेजीत आहेत. तर नेस्ले इंडिया, टायटन, ॲक्सिस बँक, एचसीएल टेक हे शेअर्स घसरले आहेत.

निफ्टीवर बीपीसीएल, एचडीएफसी लाईफ, अदानी पोर्ट्स, पॉवर ग्रिड, LTIMindtree हे शेअर्स टॉप गेनर्स आहेत. तर अपोलो हॉस्पिटल, एचसीएल टेक, ॲक्सिस बँक, नेस्ले इंडिया या शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे.

विशेषतः मिड आणि स्मॉलकॅप क्षेत्रात खरेदी होत आहे. बाजाराला ऑटो, मेटल आणि सरकारी बँकिंग शेअर्समधील तेजीचा सपोर्ट मिळत आहे.

याआधी मंगळवारी सेन्सेक्स ४५६ अंकांनी घसरून ७२,९४३ वर बंद झाला होता. बुधवारी रामनवमी निमित्त शेअर बाजाराला सुट्टी होती. बेंचमार्क निफ्टी ५० आणि बीएसई सेन्सेक्स गेल्या तीन सत्रांमध्ये प्रत्येकी २.७ टक्क्यांनी घसरले होते.

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदरात लवकर कपात होणार नसल्याचे संकेत दिले आहे. यामुळे काल बुधवारी अमेरिकेच्या शेअर बाजारातील निर्देशांक घसरण बंद झाले होते. दरम्यान, आशियाई बाजारातील निर्देशांक किरकोळ वाढीसह खुले झाले आहेत. (Stock Market Updates)

हे ही वाचा :

 

Back to top button