Arvind Kejriwal | केजरीवालांना आणखी एक झटका; PA बिभव कुमार पदावरून बडतर्फ, दक्षता विभागाची कारवाई | पुढारी

Arvind Kejriwal | केजरीवालांना आणखी एक झटका; PA बिभव कुमार पदावरून बडतर्फ, दक्षता विभागाची कारवाई

पुढारी ऑनलाईन डेस्क: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना एकामागून एक धक्के बसत आहेत. ईडीच्या केजरीवालांवर सुरू असलेल्या कारवाईला आव्हान देणारी याचिका दोन दिवसांपूर्वी दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली. त्यांनंतर केजरीवाल यांचे स्वीय सचिव (पीए) बिभव कुमार यांना पदावरून बडतर्फ करण्यात आले आहे. या संदर्भातील आदेश दिल्ली दक्षता विभागाने जारी केला आहे.  हा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आणखी एक धक्का मानला जात आहे. मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी ईडीने विभव यांची यापूर्वीच चौकशी केली आहे. त्याआधारे कारवाई करत त्याला आता कार्यमुक्त करण्यात आले आहे. (Arvind Kejriwal)

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या धक्क्यांची मालिका थांबत थांबत नाही. सीएम केजरीवाल यांचे खासगी सचिव (पीए) बिभव कुमार यांची दक्षता विभागाने हकालपट्टी केली आहे. ईडीने मद्य घोटाळ्याप्रकरणी विभव कुमारचीही अनेकवेळा चौकशी केली आहे. मंगळवारी (दि.९) उच्च न्यायालयाने केजरीवालांच्या अटकेचे समर्थन केले होते, तर बुधवारी (दि.१०) राऊस अव्हेन्यू न्यायालयाने त्यांना आठवड्यातून पाच वेळा त्यांच्या वकिलाला भेटण्याची परवानगी देण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली होती. (Arvind Kejriwal)

केजरीवाल यांना त्यांच्या अटकेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात तात्काळ सुनावणी हवी होती, पण तेथेही विशेष खंडपीठ स्थापन करण्यात आले नाही. तसेच, अरविंद केजरीवाल यांच्या सरकारमधील मंत्री राजकुमार आनंद यांनीही आपलेच मुख्यमंत्री भ्रष्टाचारात गुंतल्याचे समजल्यानंतर राजीनामा दिला होता. आणि आता त्यांचे स्वीय सचिव बिभव कुमार यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.

हेही वाचा:

 

Back to top button