Israel-Gaza war : इस्रायलचा गाझावर हवाई हल्ला; हमासच्या प्रमुख नेत्याच्या तीन मुलांचा मृत्यू | पुढारी

Israel-Gaza war : इस्रायलचा गाझावर हवाई हल्ला; हमासच्या प्रमुख नेत्याच्या तीन मुलांचा मृत्यू

पुढारी ऑनलाईन डेस्क : गाझा पट्टीमध्ये ईस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात हमासचा प्रमुख नेता इस्माईल हनीयेहची ३ मुले ठार झाली आहेत. पॅलेस्टिनी इस्लामी गट इस्माईलच्या कुटुंबाकडून या हल्ल्याची पुष्टी केली आहे. IDF ने दावा केला आहे की हनीयेहची अमीर, हाझेम आणि मोहम्मद या तीघांचा हल्ल्यात मृत्यू झाला आहे.

इस्रायली लष्कर आयडीएफ (IDF) ने दावा केला आहे की हनीयेहची तीन मुले अमीर, हाझेम आणि मोहम्मद गाझामध्ये दहशतवादी कारवाया करण्यासाठी जात असताना हवाई हल्ल्यात सापडले. इस्माईल हनीयेहने अल जझीराला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, जेरुसलेम आणि अल-अक्सा मशीद स्वतंत्र करण्यासाठी झालेल्या युद्धात त्यांच्या चार मुलांपैकी तीन जणांचा मृत्यू झाला. ते म्हणाले की, शत्रूला वाटते की हमास नेत्यांच्या कुटुंबीयांना लक्ष्य करून ते आपल्याला नमते घेतील. यामुळे आम्ही आमच्या मागण्यांपासून मागे हटू. माझ्या मुलांना लक्ष्य करून ते हमासला आपली भूमिका बदलण्यास भाग पाडतील, असे कोणाला वाटत असेल, तर तो भ्रम असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

इस्माईल हनीयेह हमासचा प्रमुख

२९ जानेवारी १९६२ रोजी गाझा पट्टीतील निर्वासित शिबिरात जन्मलेल्या हनीयेहने शिकत असतानाच हमासमध्ये प्रवेश केला. २००६ मध्ये हानिया पॅलेस्टाईनचा पंतप्रधान बनला. काही वर्षांपूर्वी तो गाझा पट्टीतून पळून कतारला गेला होता. हानिया सध्या कतारमध्ये राहत आहे.

हमास म्हणजे काय?

पॅलेस्टाईनची इस्लामिक अतिरेकी संघटना आहे. १९८७ मध्ये केले होते. इस्माईल हनीयेह हा त्यांचा नेता आहे. इस्रायल आणि अमेरिकेसह अनेक देशांनी हमासला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. २००७ पासून गाझा पट्टीवर हमासचे वर्चस्व आहे. हमास अनेक दिवसांपासून इस्रायलवर हल्ले करत आहे. इराणचा हमासला सर्वाधिक पाठिंबा आहे. हमासला इराणकडून सर्वाधिक निधी मिळतो.

हेही वाचा : 

Back to top button