नोंदणी विभागाचा गल्ला फुल; 50 हजार 500 कोटी महसूल जमा | पुढारी

नोंदणी विभागाचा गल्ला फुल; 50 हजार 500 कोटी महसूल जमा

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील नागरिकांनी मालमत्ता खरेदी-विक्रीकडे चांगलीच लक्ष दिले असल्याची बाब समोर आली आहे. राज्य नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडे संपलेल्या आर्थिक वर्षात 28 लाख 26 हजार 150 दस्तांची नोंदणी होऊन तब्बल 50 हजार 500 कोटी रुपयांचा विक्रमी महसूल जमा झाला आहे. विभागाला सुरुवातीला 45 हजार कोटी आणि त्यानंतर वाढीव 50 हजार कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यात नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाला यश आले आहे.

राज्याला सर्वाधिक महसूल मिळवून देण्यात नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचा क्रमांक लागतो. जमीन, सदनिका, दुकाने आदींची खरेदी-विक्री, दोन व्यक्ती किंवा संस्थांमध्ये होणारे करार, बक्षीसपत्र, ऑनलाइन भाडेकरार अशा विविध दस्तांची नोंदणी करताना मुद्रांक शुल्क भरावे लागते. मुद्रांक शुल्कातून नोंदणी विभागाला हा महसूल मिळाला आहे. नोंदणी महानिरीक्षक हिरालाल सोनवणे म्हणाले, राज्य शासनाकडून दरवर्षी नोंदणी व मुद्रांक विभागाला महसुलाचे उद्दिष्ट दिले जाते. सन 2023-24 या वर्षासाठी शासनाने विभागाला 50 हजार कोटींचे उद्दिष्ट दिले होते. उद्दिष्टापेक्षा जास्त महसूल गोळा झाला आहे.

हेही वाचा

Back to top button