मोहिते मंत्री आणि मी मुख्यमंत्री होईल; अजित पवारांचे विधान चर्चेत | पुढारी

मोहिते मंत्री आणि मी मुख्यमंत्री होईल; अजित पवारांचे विधान चर्चेत

राजगुरुनगर : पुढारी वृत्तसेवा : आमदार दिलीप मोहिते पाटील जेंव्हा मंत्री होतील तेव्हा मी मुख्यमंत्री होईल अशी गुगली राज्याचे उपमुख्य मंत्री अजित पवार यांनी टाकली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत खेड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या घरासमोर बुधवारी (दि २०) झालेल्या या मेळाव्यात अजित पवार यांनी नेहमीच्या पद्धतीने उपस्थीत कार्यकर्त्यांशी दिलखुलास चर्चा करीत भाषण केले.
आढळराव पाटील यांच्याकडून भविष्यात त्रास होऊ नये याची खबरदारी घेतली जावी.

आमदार मोहिते पाटील यांनी प्रस्तावीत केलेल्या प्रकल्प, विकास कामाना मान्यता मिळावी. अशा विविध विषयांवर कार्यकर्त्यांनी मत मांडले.महादेव ठाकुर पाटील यांनी आमदार मोहिते पाटील यांना मंत्रिपद द्या अशी मागणी केली. त्यानंतर जिवन खराबी यांनी अजित पवार यांना तुम्ही मुख्यमंत्री झाले पाहिजेत, तुम्ही सांगाल ते करायला आम्ही तयार आहोत असे म्हटले. त्यावर ज्यावेळेस दिलीप मोहिते पाटील मंत्री होतील तेव्हा मी मुख्यमंत्री होईल. असे विधान केले आणि त्यांच्या या मिश्किल टिपण्णीचे उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले. त्यानंतर काही वेळ हशा पिकला.

राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार मोहिते पाटील, सुरेखाताई मोहिते पाटील, सुरेश घुले, पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा निर्मला पानसरे, महिला अध्यक्षा श्रीमती हारगुडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष कैलास सांडभोर, बाजार समितीचे सभापती कैलास लिभोरे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अरूण चांभारे , अनिल बाबा राक्षे, मंगल चांभारे, पंचायत समितीचे माजी सभापती अरूण चौधरी, खेड तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष राजाराम लोखंडे, आनंदा काळे आदी मान्यवर आणि पक्षाचे तालुक्यातील कट्टर मोहिते पाटील समर्थक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. –

आपण नाकारले म्हणुन आढळराव पाटील शिवसेनेत गेले

माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या उमेदवारी वर शिक्कमोर्तब करण्याआधी हा मेळावा घेण्यात आला.त्यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली असून या बाबत सर्वांना विश्वासात घेऊन घोषणा केली जाईल. आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आंबेगाव तालुका अध्यक्ष आणि भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पद असताना राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार केला होता. त्यांना २००४ मध्ये आपण उमेदवारी नाकारली म्हणुन ते शिवसेनेत गेले,असे अजित पवार यांनी सांगितले

हेही वाचा

Back to top button