Loksabha election : लवकरच ठरणार पुण्यातील काँग्रेसचा उमेदवार : इच्छुकांचा अंदाज | पुढारी

Loksabha election : लवकरच ठरणार पुण्यातील काँग्रेसचा उमेदवार : इच्छुकांचा अंदाज

पुणे : काँग्रेसच्या उमेदवार निवडीसाठी पक्ष नेत्यांची मंगळवारी (दि.19) दिल्लीत बैठक झाली असली तरी पुण्यातील उमेदवाराचे नाव येत्या चार- पाच दिवसांत ठरेल, असा अंदाज स्थानिक इच्छुकांनी व्यक्त केला. पहिल्या टप्प्यात निवडणूक असलेल्या मतदारसंघातील उमेदवार निवडण्याला प्राधान्य देण्यात येणार असल्याने पश्चिम महाराष्ट्रातील उमेदवार नंतर ठरवले जाणार असल्याचे सांगण्यात आले.
काँग्रेसकडून कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर, माजी आमदार मोहन जोशी, शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी गटनेते आबा बागूल यांच्यासह संग्राम खोपडे इच्छुक आहेत.

पुण्यात इच्छुकांसह पदाधिकार्‍यांची बैठक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी काँग्रेस भवनमध्ये शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ नेते, प्रमुख पदाधिकारी व इच्छुकांची बैठक झाली. पक्ष जो उमेदवार देईल, त्याला जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून आणून महाविकास आघाडीचे हात बळकट करण्याचे मत या वेळी अनेकांनी व्यक्त केले. या वेळी आमदार रवींद्र धंगेकर, माजी आमदार मोहन जोशी, माजी राज्यमंत्री रमेश बागवे, बाळासाहेब शिवरकर, अ‍ॅड. अभय छाजेड, कमल व्यवहारे, दीप्ती चवधरी, आबा बागूल, संजय बालगुडे, वीरेंद्र किराड आदी उपस्थित होते.

हेही वाचा

Back to top button