कार्यकर्त्यांचा आग्रह; मात्र मी निवडणूक लढणार नाही : शरद पवार | पुढारी

कार्यकर्त्यांचा आग्रह; मात्र मी निवडणूक लढणार नाही : शरद पवार

पुणे; पुढारी वृत्तसेवा : लोमी कसभा निवडणूक लढवावी, अशी मागणी पुणे, माढा आणि सातारा या लोकसभा मतदारसंघांतील कार्यकर्त्यांकडून केली जात आहे; पण आतापर्यंत मी 14 निवडणुका लढवल्या आणि जिंकल्या आहेत. आता निवडणूक लढणार नाही, असा पुनरुच्चार खुद्द राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मंगळवारी (दि. 19) पुण्यात पत्रकारांशी बोलताना केला.

लोकसभेची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाल्याने सर्वच पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. सर्वच पक्ष उमेदवारांचा शोध घेत आहेत. भाजपने पुणे लोकसभेसाठी माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी जाहीर केल्याने ते नेत्यांच्या गाठीभेटी घेत प्रचाराला लागले आहेत. तर दुसरीकडे मोहोळ यांच्या विरोधात महाविकास आघाडी कोणता उमेदवार देणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे. आघाडीत पुणे मतदारसंघ काँग्रेसकडे असल्याने आमदार व माजी आमदारांसह पदाधिकार्‍यांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. असे असताना शरद पवार यांनी पुणे, माढा व सातार्‍यातून मी निवडणूक लढवावी, अशी कार्यकर्त्यांची मागणी असल्याचे सांगत सर्वांनाच धक्का दिला आहे.

Back to top button