जळगाव : संविधानाने दिलेला मतदानाच्या हक्कासाठी सर्वांनी बाहेर पडा – विजय काळे | पुढारी

जळगाव : संविधानाने दिलेला मतदानाच्या हक्कासाठी सर्वांनी बाहेर पडा - विजय काळे

जळगाव : पुढारी वृत्तसेवा
मतदानाचा अधिकार हा संविधानाने दिलेला आहे. पूर्वी राजाचा मुलगा राजा व्हायचा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या मतदानाच्या अधिकारामुळे सर्वसामान्य नागरिकांना आता आपला आवडता प्रतिनिधी निवडता येतो आहे. लोकशाहीच्या उत्सव साजरा करताना मतदान करण्यासाठी मोठ्या उत्साहाने घराबाहेर पार पाडावे असे बहुजन समाज पार्टीचे उमेदवार विजय काळे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.

बहुजन समाज पार्टीचे उमेदवार विजय काळे यांनी पत्रकार परिषद घेऊन संविधानामुळे आपल्याला मतदानाचा अधिकार मिळालेला आहे. त्या संविधानाच्या अधिकाराचा योग्य उपयोग करावा. मोठ्या उत्साहाने मतदानाला घराबाहेर पडून मतदान करावे असे आवाहन केले. विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मैदान, सभागृहात पूर्वीपासून बुकींग करत सभा, मेळावेचे आयोजन केलेले आहेत. त्यामुळे सभा घेण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. तर काही उमेदवारांनी पक्ष बदललेले आहेत. त्या उमेदवारांना मतदार आपली जागा दाखवेल असेही काळे म्हणाले.

हेही वाचा:

Back to top button