Fire Accident : आलिशान वाहनांच्या गॅरेजला भीषण आग : कारण अस्पष्ट | पुढारी

Fire Accident : आलिशान वाहनांच्या गॅरेजला भीषण आग : कारण अस्पष्ट

पुणे/बिबवेवाडी : पुढारी वृत्तसेवा : गंगाधाम रस्त्यावर आई माता मंदिराजवळ एका गॅरेजमध्ये पहाटे भीषण आग लागली. आगीत 17 महागड्या कार जळून खाक झाल्या. आगीमागचे कारण मात्र समजू शकले नाही. गंगाधाम रस्त्यावर आई मातीन कार गॅरेज आहे. गॅरेजमध्ये महागड्या कार दुरुस्तीसाठी पाठविण्यात येतात. पहाटे साडेतीनच्या सुमारास गॅरेजमध्ये आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. त्यानंतर अग्निशमन दलाचे चार बंब घटनास्थळी दाखल झाले.

अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहचेपर्यंत गॅरेजमधील गाड्यांनी पेट घेतला होता. जवानांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. आगीत 17 महागड्या कार जळून खाक झाल्या. आग लागल्यानंतर परिसरात मोठ्या प्रमाणावर धूर निर्माण झाला. पहाटे झोपेत असलेल्या रहिवाशांना धुरामुळे जाग आली. आगीत कोणी जखमी झाले नाही. आगीमागचे कारण समजू शकले नाही, अशी माहिती अग्निशमन दलाच्या अधिकार्‍यांनी दिली. अग्निशमन दलाचे अधिकारी संजय रामटेके, कैलास शिंदे, मनीष बोंबले, महादेव मांगडे, शैलेश गोरे, राजेश घडशी, वैभव राऊत, कुणाल खोडे, मंदार वानखेडे यांनी ही आग आटोक्यात आणली.

हेही वाचा

Back to top button