Stock Market Closing Today | बाजारात जोरदार खरेदी, सेन्सेक्स ७३ हजार पार, IT स्टॉक्सचा सपोर्ट | पुढारी

Stock Market Closing Today | बाजारात जोरदार खरेदी, सेन्सेक्स ७३ हजार पार, IT स्टॉक्सचा सपोर्ट

पुढारी ऑनलाईन : शेअर बाजारात गुरुवारी (दि.१४) जोरदार रिकव्हरी दिसून आली. सपाट सुरुवातीनंतर सेन्सेक्स ३३५ अंकांनी वाढून ७३,०९७ वर बंद झाला. तर निफ्टी १४८ अंकाच्या वाढीसह २२,१४६ वर स्थिरावला. आज बाजाराला IT स्टॉक्सचा सपोर्ट मिळाला. (Stock Market Closing Bell)

बँकिंग वगळता आज सर्व क्षेत्रांमध्ये खरेदी झाली. टेलिकॉम, पॉवर, ऑईल आणि गॅसमध्ये प्रत्येकी ३ टक्के वाढ झाली, तर ऑटो, कॅपिटल गुड्स, एफएमसीजी, हेल्थकेअर, मेटल १-२ टक्क्यांनी वाढले. विशेष म्हणजे तीन दिवसांच्या घसरणीनंतर आज मिड आणि स्मॉल कॅप निर्देशांकात जोरदार रिकव्हरी झाली. बीएसई मिडकॅप निर्देशांक २.२ टक्क्यांनी आणि स्मॉलकॅप निर्देशांक ३ टक्क्यांनी वाढून बंद झाला.

बाजारात सर्वाधिक खरेदी आयटी, PSU आणि मेटल क्षेत्रात राहिली. तर स्टील शेअर्समध्ये विक्री दिसून आली. निफ्टीवर अदानी पोर्ट्स आणि अदानी एंटरप्रायजेसच्या शेअर्समध्ये अनुक्रमे ६ टक्के आणि ४ टक्क्यांनी वाढ झाली. तसेच निफ्टी स्मॉलकॅप १०० निर्देशांक जवळपास ३.५ टक्क्यांनी वाढला, तर मायक्रोकॅप निर्देशांक सुमारे ४ टक्क्यांनी वाढला.

सेन्सेक्स आज ७२,५७० वर खुला झाला होता. त्यानंतर तो ७३,३६४ पर्यंत वाढला. सेन्सेक्सवर एचसीएल टेक, विप्रो, इन्फोसिस, भारती एअरटेल, एलटी, एम अँड एम, टीसीएस, टेक महिंद्रा, एशियन पेंट्स हे शेअर्स सर्वाधिक वाढले. तर ॲक्सिस बँक, इंडसइंड बँक, जेएसडब्ल्यू स्टील, टाटा स्टील या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.

sensex closing

निफ्टी ५० वर अदानी एंटरप्रायजेस, अदानी पोर्ट्स, हिरो मोटोकॉर्प, हिंदाल्को, एचसीएल टेक हे शेअर्स ३ ते ६ टक्क्यांदरम्यान वाढले. तर अॅक्सिस बँक, इंडसइंड बँक, जेएसडब्ल्यू स्टील, टाटा स्टील हे शेअर्स घसरले.

YES Bank शेअर्स वधारला

येस बँकेचे शेअर्स BSE वर ९ टक्क्यांनी वाढून २२.८५ रुपयांवर पोहोचले. (YES Bank Share Price) येस बँक नवीन प्रमोटर शोधत असल्याचे वृत्त आहे. यादरम्यान येस बँकेचे शेअर्स वधारले आहेत. लाइव्ह मिंटच्या वृत्तानुसार, बँक त्यांची ५१ टक्क्यांपर्यंतची हिस्सेदारी विकण्याचा विचार करत आहे. त्यांचे ८-९ अब्ज डॉलर्सच्या दरम्यान मूल्यांकन लक्ष्य आहे. (Stock Market Closing Bell)

रेल्वे शेअर्सही तेजीत

आज रेल्वे कंपन्यांचे शेअर्स १३ टक्क्यांपर्यंत वाढले. इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन (IRFC), रेल विकास निगम (RVNL), Ircon इंटरनॅशनल, Texmaco Rail, RailTel Corporation of India आणि टिटागड रेलसिस्टम चे शेअर्स १३ टक्क्यांपर्यंत वाढले. काल बुधवारी रेल्वे शेअर्स २० टक्क्यांपर्यंत घसरले होते. आज IRFC चा शेअर्स १३ टक्के वाढून टॉप गेनर ठरला. हा शेअर्स आज १४२ रुपयांपर्यंत गेला. त्यानंतर तो १४० रुपयांवर स्थिरावला.

हे ही वाचा :

Back to top button