Stock Market | टाटा ग्रुपचा बोलबाला! FPIS ची भारतातील ऑटो शेअर्समधील गुंतवणूक वाढली | पुढारी

Stock Market | टाटा ग्रुपचा बोलबाला! FPIS ची भारतातील ऑटो शेअर्समधील गुंतवणूक वाढली

शुक्रवार, दिनांक 8 मार्च रोजी महाशिवरात्रीमुळे बाजार बंद होते. गुरुवारी 22493.55 हा निफ्टीचा बंदभाव असला, तरी त्याच दिवशी 22525.65 हा नवीन उच्चांक प्रस्थापित करून निफ्टीने 22500 च्या पार आपला झेंडा रोवला. आता याच सप्ताहात 23000 चा महत्त्वाचा टप्पा निफ्टीने गाठला, तर महिनाअखेरीस 24000 ला तो गवसणी घालेल काय? सेन्सेक्स तर 74000 पार करून तेथे पाय रोवून उभा आहे (74119.39). (Stock Market)

परंतु, या सप्ताहात निफ्टी बँकने चांगली तेजी पकडली. सुमारे तीन टक्क्यांनी वाढून तो 47835.80 वर बंद झाला. 48636.45 हा त्याचा पूर्वीचा उच्चांक आहे. तोही याच सप्ताहात मोडला गेला, तर निफ्टी बँकची घोडदौड 50 हजारांकडे सुरू होईल.

मागच्याच आठवड्यात तिसर्‍या तिमाहीतील GDP वाढीने बाजाराला सुखद धक्का दिला होता. आता मूडीजनेही आपला पूर्वीचा 6.6 टक्के हा भारताच्या GDP वाढीचा 2024 मधील अंदाज वाढवून 8 टक्क्यांवर नेला आहे. भारत सरकारचा भांडवली खर्च आणि consymption या गोष्टी भारताला हा विकास दर गाठण्यास मदत करतील, असे मूडीजचे म्हणणे आहे.

या सर्व कंपन्यांमध्ये एकाचवेळी इतकी तेजी येण्याचे कारण काय? तर, टाटा सन्स ही टाटा ग्रुपमधील सर्व कंपन्यांची होल्डिंग कंपनी आहे. रिझर्व्ह बँकेने मागील वर्षी टाटा सन्सला Upper Layer Non Banking Finance हा दर्जा बहाल केला होेता. त्यानुसार तीन वर्षांच्या आत टाटा सन्सला शेअर बाजारामध्ये नोंदणी करावी लागेल आणि या अनषंगाने सप्टेंबर 2025 मध्ये टाटा सन्सचा आयपीओ बाजारात येऊ शकतो, अशी बातमी पसरली. त्याचा हा परिणाम! कारण, टाटा सन्सचा हा आयपीओ केवळ टाटांच्या इतिहासात नव्हे, तर भारतीय शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठा आयपीओ असेल.

वरच्या यादीतील Tata Investment Corporation Ltd. हा शेअर एका महिन्यात 80 टक्के, तर मागील एका वर्षात 382 टक्के वाढला आहे. एक वर्षापूर्वी 1730 रुपयांना मिळणारा हा शेअर आज दहा हजारांच्या जवळपास आहे. टाटा ग्रुपचीच आणखी एक बातमी म्हणजे टाटा मोटर्सने विभाजन होऊन Passenger Vehicles आणि Commercial Vehicles अशा दोन स्वतंत्र कंपन्या अस्तित्वात येतील. या दोन्ही बातम्यांमुळे टाटा मोटर्स सप्ताहात सात टक्के वाढला आणि 1000 रुपयांचा महत्त्वाचा टप्पाही पार पाडला.

‘इकॉनॉमिक टाईम्स’च्या शुक्रवारच्या अंकातील एका माहितीनुसार Foreign Portfolio Investors Zr (FPIS) भारतातील ऑटो कंपन्यांच्या शेअर्समधील आपली गुंतवणूक वाढवली आहे. FPIS चा भारतातील इक्विटी AUM रु. 763 बिलियन डॉलर्स एवढा आहे. त्याचे Sectorwise फेब्रुवारीअखेर Allocation खालीलप्रमाणे : (टक्के)

Finance Services – 28.79
IT – 10.29
Oil & Gas – 9. 50
Automobile – 7.14
FMCG – 6. 35
Health Care – 5.95
Capital Goods – 4.62
Power – 4.47
Consumer Services – 3.45
Consumer Durables – 3.11
ज्या सेक्टर्समध्ये FPIS नी अलीकडे गुंतवणूक वाढवली आहे ती सेक्टर्स म्हणजे Consumer Services, Auto, Capital Goods, Power आणि Health Care Va Oil & Gas, Financial Services, FMCG, IT, Media या सेक्टर्समधील गुंतवणूक त्यांनी कमी केली आहे. Tata motors, M & M, Havells, L & T, Tata Power, Narayan Hrudayalaya या शेअर्सकडे वाचकांनी एक वर्षाचा द़ृष्टिकोन ठेवून बघण्यास हरकत नाही. (Stock Market)

Back to top button