‘इंदिरा गांधींसारखी गत होईल’ : खलिस्तानींची पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी | Threat to PM Modi | पुढारी

'इंदिरा गांधींसारखी गत होईल' : खलिस्तानींची पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी | Threat to PM Modi

पुढारी ऑनलाईन डेस्क : काही खलिस्तानींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. इंदिरा गांधी यांच्यासारखी तुमची हत्या केली जाईल, तुमची गत इंदिरा गांधींसारखी होईल, अशा आशयाचा धमकी देणारा व्हिडिओ व्हॉटसअप आणि सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. (Threat to PM Modi)

या व्हिडिओत एक खलिस्तानी युवक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देतो आणि खलिस्तान समर्थनाच्या घोषणा देताना दिसतो. आतापर्यंत खलिस्तान्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धमकी देण्याची पाचवी घटना असल्याचे द ऑर्गनायझर या वेबसाईटने म्हटले आहे. (Threat to PM Modi)

पंजाब हरियाणा आणि हरियाणा दिल्ली सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर हे व्हिडिओ व्हायरल करण्यात आले आहेत, असे या वेबसाईटने म्हटले आहे.

यापूर्वी एका युवकाने एक व्हिडिओ गेम बनवली होती, यात पंतप्रधान मोदी यांची हत्या होते; असे दाखवण्यात आले होते. हा व्हिडिओ बनवणारा युवक मनप्रीत सिंग याने नंतर ही व्हिडिओ गेम डिलिट करून माफी मागितली होती. पंतप्रधान मोदी यांच्या वाहनांचा ताफा आडवण्याचा प्रकारही यापूर्वी पंजाबमध्ये घडला होता.

हेही वाचा

Back to top button