Canada Khalistan Terrorist: खलिस्तानी दहशतवादी निज्जरच्या हत्येचा व्हिडीओ समोर; या प्रकरणानेच भारत-कॅनडा संबंध बिघडले

Canada Khalistan Terrorist
Canada Khalistan Terrorist

पुढारी ऑनलाईन डेस्क: गेल्या वर्षी जूनमध्ये खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. आता निज्जर यांच्या हत्येचा कथित व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये हल्लेखोर निज्जरला गोळ्या घालून पळताना दिसत आहेत. निज्जरच्या हत्येमुळे भारत आणि कॅनडाचे संबंध ताणले गेले होते आणि हे प्रकरण दोन्ही देशांमधील वादाचे कारण बनले होते. (Canada Khalistan Terrorist)

Canada Khalistan Terrorist: काय आहे व्हिडिओमध्ये?

कॅनडातील सरे येथे अज्ञात हल्लेखोरांनी गुरू नानक शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीचे तत्कालीन अध्यक्ष हरदीप सिंग निज्जर यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, हत्येच्या घटनेदिवशी हरदीप सिंग निज्जर गुरुद्वाराच्या पार्किंगमधून त्याच्या पिकअप ट्रकमधून बाहेर आले. ते बाहेर येताच हरदीपसिंग निज्जर यांच्यावर गोळीबार करण्यात आला. कॅनडाच्या एका मीडिया हाऊसने हा जारी केलेला व्हिडिओ व्हायरल होत आहे. (Canada Khalistan Terrorist

निज्जर यांच्यावर गोळ्या झाडून हल्लेखोर पसार

मीडिया रिपोर्ट्सनुसार, खलिस्तानी दहशतवादी निज्जर यांच्यावर गोळ्या झाडल्यानंतर हल्लेखोर सिल्व्हर रंगाच्या टोयोटा कॅमरी कारमधून पळून गेले. निज्जरला ज्या ठिकाणी गोळी लागली त्या ठिकाणापासून काही अंतरावर दोन तरुण फुटबॉल खेळत होते. गोळीचा आवाज ऐकताच ते घटनास्थळी पोहोचले. त्यातील एकजण निज्जर यांची मदत करण्यासाठी पोहोचला तर दुसऱ्या तरुणाने हल्लेखोरांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र हल्लेखोर कारमधून पळून गेले, यामध्ये तीन जण होते, असे फुटबॉल खेळणाऱ्यांनी स्पष्ट केले.

निज्जर यांच्या हत्येमुळे भारत आणि कॅनडाचे संबंध बिघडले

हरदीपसिंग निज्जरच्या हत्येला नऊ महिने उलटून गेले. मात्र अद्यापपर्यंत रॉयल कॅनेडियन माऊंटेड पोलिस संशयितांची नावे उघड करू शकलेले नाहीत. या प्रकरणात अजून कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. निज्जर यांच्या हत्येबाबत कॅनडाच्या पंतप्रधानांनी या हत्येत भारत सरकारचा हात असल्याचा आरोप केला होता. कॅनडाच्या पंतप्रधानांच्या आरोपांमुळे भारत-कॅनडा संबंध बिघडले होते. कॅनडाचे आरोप भारताने बेताल ठरवून फेटाळले. दरम्यान भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, निज्जर यांच्या हत्येबाबत कॅनडाने आतापर्यंत कोणतेही पुरावे दिलेले नसल्याचे स्पष्ट केले आहे.

हे ही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news