राष्ट्रवादी काँग्रेसला लोकसभेच्या तीन जागा मिळतील अशी चर्चा : हसन मुश्रीफ | पुढारी

राष्ट्रवादी काँग्रेसला लोकसभेच्या तीन जागा मिळतील अशी चर्चा : हसन मुश्रीफ

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसला लोकसभेच्या तीन जागा मिळतील, अशी चर्चा असल्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी सांगितले. महायुतीचा फॉर्म्युला आजच निश्चित होईल, असेही त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.

राष्ट्रवादीला चार जागा मिळतील अशी शक्यता आहे, याबाबत काय? असे विचारता, तुमचा आभारी आहे की, तुम्ही आम्हाला चार जागा मिळतील असे म्हणता. मात्र, आम्हाला तीन जागा मिळतील अशी चर्चा आहे, असे मुश्रीफ म्हणाले. नीलेश लंके पुन्हा शरद पवार यांच्यासमवेत जात आहेत. याबाबत विचारले असता मुश्रीफ म्हणाले, लंके यांना लोकसभा लढवायची आहे. मात्र, ती जागा भाजपला जाणार आहे. यामुळे ते निर्णय घेत असण्याची शक्यता आहे. निवडणुका सुरू झाल्यावर माणसे येत असतात, जात असतात, मात्र पक्ष तिथेच राहतो, असेही त्यांनी सांगितले.

Back to top button