Ananat Ambani : अन्‌ अनंतने आजाराबद्दल सांगताच मुकेश अंबानींचे पाणावले डोळे (Video) | पुढारी

Ananat Ambani : अन्‌ अनंतने आजाराबद्दल सांगताच मुकेश अंबानींचे पाणावले डोळे (Video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : माझ्या आई-वडिलांनी मला कधीच आजारपणाची जाणीव होऊ दिली नाही. माझं बालपण गुलाबांच्या फुलांप्रमाणे कधीच भरलेलं नव्हतं. (Ananat AmbaniAnanat Ambani ) उलट मी बालपणापासून काट्यांच्या वेदना झेलल्या आहेत. पण नेहमीच माझे आई वडील माझ्यासोबत उभे राहिले, असे अनंत अंबानी म्हणताच प्रेक्षकांमध्ये समोर बसलेले प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे डोळे पाणावले. ते आपले अश्रू रोखू शकले नाही. (Ananat Ambani )

जेव्हा रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा सर्वात लहान मुलगा अनंत अंबानीने बालपणापासून आरोग्य संबंधी समस्यांशी मोठा संघर्ष केला आहे. यावेळी त्याचे वडील उद्योगपती मुकेश अंबानी अश्रू रोखू शकले नाहीत. अंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या प्री-वेडिंग सोहळ्यात अनंत अंबानीने सांगितले की, “मी बालपणापासून अनेक वेदना, संकटे झेलल्या आहेत. आरोग्याच्या समस्या उद्भवल्यानंतर त्याच्याशी संघर्ष सुरुच होता. पण माझ्या आई-वडिलांनी कधीच मला आजारपणाची जाणीव होऊ दिली नाही.

अनंतची आई नीता अंबानी म्हणाल्या- अनंत बालपमापासून अस्थमाचा (highly asthmatic) रुग्ण होता. आम्हाला त्याला खूप सारे स्टेरॉईड द्यावे लागले. औषधांता हा परिणाम झाला की, त्याचे वजन वाढत गेले, त्यावेळी त्याचे वजन २०८ किलो झाले. आरोग्याच्या समस्येमुळे तो अधिक व्यायाम करू शकत नव्हता. औषधांमुळे भूखदेखील लागायचीय तरीही, अनंतने २०१६ मध्ये १८ महिन्यांत जवळपास १०८ किलो वजन कमी करून स्वत: मध्ये बदल केला. तो रोज सहा तास व्यायाम करत होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

अनंत अंबानीचे डॉक्टर मुजफ्फल लकडावाला एका मुलाखतीत म्हणाले होते- तो तरुण बालपणातच ओबेसिटीचा सामना करतोय. त्याला वयाच्या दुसऱ्या वर्षी अस्थमा झाला. २०१६ मध्ये त्याने अनपेक्षितपणे खूप कमी कालावधीत वजन घटवले. तो ५०० किलो कॅलरीहून कमी असलेला आहार घ्यायचा. त्याने व्यायामात सातत्य ठेवले. पण, डॉक्टर म्हणाले होते की, दुसऱ्यांदा वजन वाढल्यानंतर वजन घटवण्याची त्याची ट्रिक कामी आली नाही. डॉ. लकडावाला म्हणाले, जेव्हा तुमचे शरीर वजनाने ग्रस्त असते, तेव्हा नेहमी तुम्हाला तुमच्या आधीच्या वजनाकडे परत खेचण्याचा प्रयत्न करचेय या समसयांनंतरही आरोग्याच्या संबंधी समस्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तो सकारात्मक ठरला.

video – viral bhayani Instagram वरून साभार

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

Back to top button