Breast Cancer : लक्षणं जाणा, धोका टाळा | पुढारी

Breast Cancer : लक्षणं जाणा, धोका टाळा

जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार भारतात 2022 या एका वर्षात कर्करोगाचे चौदा लाखांहून अधिक नवे रुग्ण आढळले. यातून एक गोष्ट स्पष्ट होते की, कर्करोगाबद्दल माहितीचा प्रसार करणं आणि त्याबद्दलच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांना प्रोत्साहन देणं आवश्यक आहे. ( Breast Cancer )

संबंधित बातम्या 

स्तनाच्या कर्करोगाचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं असल्याचं आपल्या कानावर येतं. पण, प्रत्यक्ष आकडेवारीतही महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचं प्रमाण सर्वाधिक असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेच्या अभ्यासात अधोरेखित झालं आहे. या पार्श्वभूमीवर आपण स्तनाच्या कर्करोगाविषयी जाणून घेणं आवश्यक ठरतं. स्वतःच्या स्तनाची नियमितपणे पाहणी केल्यास कर्करोगाचे सुरुवातीचे बदल लक्षात येऊ शकतात;

उदाहरणार्थ :

  • स्तनामध्ये टणक पण न दुखणारी गाठ
  • स्तनाच्या विस्तारात आणि आकारात बदल
  • स्तनाच्या बोंडांमध्ये व त्वचेच्या स्पर्शात आणि रंगात बदल
  • बोंडातून लालसर किंवा पिवळसर स्राव येणं.
  • बाजूच्या कडा सुजणं

Breast Cancer :  स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी या गोष्टी करा

  • चरबीयुक्त आहार टाळा.
  • जीवनसत्त्वं, खनिजं देणार्‍या ताज्या फळ-भाज्यांचं प्रमाण वाढवा.
  • नियमित व्यायाम.
  • वजनावर नियंत्रण.
  • मद्य, तंबाखू, मिश्रीचं सेवन टाळा.
  • गर्भनिरोधक गोळ्या, हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी वैद्यकीय सल्ल्यानुसारच घ्या.
  • तरुणपणापासूनच महिन्यातून एकदा पाळीनंतर स्वतः हाताने स्तन तपासण्याची सवय ठेवा.

हेही वाचा 

Back to top button