लॅन्सेट आशिया जर्नलच्या माहितीनुसार, आशियाई देशांत कॅन्सरच्या वाढत्या प्रमाणाला वायू प्रदूषण सर्वाधिक कारणीभूत आहे. 2019 मध्ये अंदाजे 13 लाख नवीन रुग्ण आणि 12 लाख मृत्यू झाले. विशेषत: भारत, नेपाळ, कतार, बांगलादेश आणि पाकिस्तान यासारख्या अतिशय प्रदूषणशील देशांमध्ये कर्करोगाचा वाढता भार चिंताजनक आहे. भारत, बांगलादेश आणि नेपाळ या देशांमध्ये गुटखा आणि पानमसाला यांसारख्या धूरविरहित तंबाखूच्या सेवनाच्या चिंतेवरही या अभ्यासाने प्रकाश टाकला आहे. 2019 मध्ये जागतिक मृत्यूंपैकी 32.9 टक्के तोंडाच्या कॅन्सरची 28.1 टक्के नवीन प्रकरणे एकट्या भारतात नोंदवली गेली आहेत, अशी माहिती इंग्लंडच्या ऑक्सफर्ड विद्यापीठातील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. नानासाहेब थोरात यांनी 'पुढारी' शी बोलताना दिली.