Adah Sharma Video Viral : अदा शर्माचा शेजाऱ्यासोबतचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; ‘तुम्हाला हवं ते देते म्हणत…’ | पुढारी

Adah Sharma Video Viral : अदा शर्माचा शेजाऱ्यासोबतचा 'तो' व्हिडिओ व्हायरल; 'तुम्हाला हवं ते देते म्हणत...'

पुढारी ऑनलाईन डेस्क : अदा शर्मा हे अभिनेत्री नेहमी चर्चेत असते. सोशल मीडियावर तिचे फॉलोवर्स मोठ्या प्रमाणात आहेत. सध्या तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती शेजाऱ्यासोबत संवाद साधत असते. या संवादाचा हा व्हिडिओ पाहून अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत. तिने शेजाऱ्याकडे केलेली मागणी ऐकून अनेकजण आश्चर्यचकीत होत आहेत. (Adah Sharma Video Viral)

अदा शर्मा (Adah Sharma) ‘सन्फ्लॉवर-२’ या वेबसीरीजमध्ये नवीन एन्ट्री करत आहे. या वेबसीरीजचा नुकताच एक ट्रेलर रिलीझ झाला आहे. या वेबसीरीजबद्दल अदाने बरेच काही सांगितले आहे. तिची या सीरीजमध्ये महत्त्वाची भूमिका असणार आहे. या वैबसिरीजशी संबंधित इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये तिने शेजाऱ्याशी संवाद साधत असल्याचे दिसून आली. (Adah Sharma Video Viral)

अदा शर्मा शेजाऱ्याचा दरवाजा ठोठावते. आणि शेजाऱ्याला एक वाटी रक्त द्या असं म्हणते. हे ऐकून शेजारी आश्चर्यचकित होतो. या संपूर्ण व्हिडिओत एक वाटी रक्त मागण्याची तिचा अभिनय खूप भावनिक आहे. यावेळी माझे ब्लड शुगर कमी असल्यामुळे मदत करा अशी शेजाऱ्याकडे विनवणी करते. याबद्दल तुम्हाला मनोरंजनसह आणखी मदत हवी असेल तर ती करेन असे आश्वासन देते. शेवटी तिचे दुसरे रुप दिसून येते. अशा तिच्या दोन भूमिका या व्हिडिओत दिसून येतात. (Adah Sharma Video Viral)

 

View this post on Instagram

 

A post shared by Adah Sharma (@adah_ki_adah)

हेही वाचा

Back to top button