Adah Sharma : ‘केरला स्टोरी’ फेम अदा शर्माचे कॉन्टॅक्ट डिटेल्स ऑनलाईन लीक; अभिनेत्रीला मनस्ताप

Adah Sharma : ‘केरला स्टोरी’ फेम अदा शर्माचे कॉन्टॅक्ट डिटेल्स ऑनलाईन लीक; अभिनेत्रीला मनस्ताप

मुंबई; पुढारी ऑनलाईन : बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्मा (Adah Sharma) आजकाल तिच्या 'द केरला स्टोरी' (The Kerala Story) चित्रपटाच्या यशामुळे खूप आनंदी आहे. मात्र, यशासोबतच अदाला काही समस्यांचाही सामना करावा लागत आहे. काही दिवसांपुर्वी अभिनेत्री अदाचा वैयक्तिक संपर्क तपशील ऑनलाईन लीक झाला आहे. ज्यानंतर अदाला खूप त्रास सहन करावा लागत आहे.

इन्स्टाग्रामवर लीक झाले डिटेल्स (Adah Sharma)

'झामुंडा_बोल्ते' नावाच्या इंस्टाग्राम यूजरने अदाचा हा तपशील इंस्टाग्रामवर लीक केला आहे. यासोबतच या युजरने अदाचा नवीन कॉन्टॅक्ट नंबर लीक करण्याची धमकीही दिली आहे. मात्र, ज्या अकाऊंटमधून नंबर लीक झाला ते डिअॅक्टिव्हेट करण्यात आले आहे. पण, त्याची पोस्ट आता सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ज्यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. यासोबतच अभिनेत्रीचे चाहतेही मुंबई सायबर सेलकडून या यूजरवर कारवाई करण्याची मागणी करत आहेत.

श्रेयस तळपदे सोबत दिसणार अदा

अदाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर 'द केरला स्टोरी' नंतर अदा शर्मा आता श्रेयस तळपदेसोबत 'द गेम ऑफ गिरगिट'मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात अदा पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. अदा आणि श्रेयसचा हा चित्रपट वादग्रस्त इंटरनेट गेम 'ब्लू व्हेल चॅलेंज' वर आधारित आहे. या चित्रपटाविषयी बोलताना अदा म्हणाली की, याआधीही मी 'कमांडो'मध्ये पोलिसाची भूमिका साकारली आहे. पण या चित्रपटातला पोलीस जरा वेगळा आहे.

'द केरला स्टोरी' बद्दल बोलचे झाले तर या चित्रपट आयसीस मध्ये भरती झालेल्या असहाय्य महिलांची कथा दाखवण्यात आली आहे. या चित्रपटात अदा शर्माचा उत्तम अभिनय पाहायला मिळाला. लोकांनी सुद्धा अदाच्या अभिनयाचा खूप पसंती दिली आहे.

अधिक वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news