The Kerala Story ओटीटीवर पाहता येणार, अदा शर्मा म्हणाली… | पुढारी

The Kerala Story ओटीटीवर पाहता येणार, अदा शर्मा म्हणाली...

पुढारी आनलाईन डेस्क : २०२३ मध्ये रिलीज झालेला चित्रपट द केरल स्टोरी (The Kerala Story) खूप चर्चेत राहिला. सुदीप्तो सेन (Sudipto Sen) यांचे दिग्दर्शन असलेल्या चित्रपटात अदा शर्मा (Adah Sharma) मुख्य भूमिकेत दिसली. चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. सिनेरसिक हा चित्रपट ओटीटी (The Kerala Story) वर रिलीज होण्याची प्रतीक्षा करत होते. आता अखेरीस या चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे. अदा शर्माने इन्स्टाग्रामवर स्वत: ही माहिती शेअर केली आहे.

संबंधित बातम्या –

अदा शर्मा स्टारर चित्रपट द केरल स्टोरी रिलीजच्या आधी आणि नंतरही खूप चर्चेत राहिली. या चित्रपटावरून अनेक वाद झाले. अनेक राज्यांमध्ये चित्रपटावर बंदी देखील आणली. असे असले तरी चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. कमी बजेट असलेल्या या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड तोडत चांगली कमाई केली. आता याची ओटीटी रिलीजची तयारी सुरु आहे. अदाने इन्स्टाग्रामवर याविषयी शेअर केलं आहे.
अदाने आपल्या इन्स्टावर लिहिलं- ‘अखेर, चित्रपट लवकरच ZEE5 वर येत आहे! The Kerala Story चे प्रीमियर १६ फेब्रुवारीला, केवळ ZEE5 वर होईल.’

विपुल शाह यांचे प्रोडक्शन असून हा चित्रपट १८ ते २० कोटी बजेटमध्ये तयार झाला होता. चित्रपट ५ मे, २०२३ रोजी हा चित्रपट चित्रपटगृहामध्ये रिलीज झाला होता. चित्रपटाने पहिल्या दिवशी ८.०३ कोटी रुपये कमावून धमाकेदार ओपनिंग केली होती.

 

Back to top button