Adah Sharma : ‘मी सर्वांना त्रास देते, बार डान्सर बनून अंधारात…’ अदा शर्माने सांगितले सनफ्लॉवर-२ चे रहस्य

Adah Sharma : ‘मी सर्वांना त्रास देते, बार डान्सर बनून अंधारात…’ अदा शर्माने सांगितले सनफ्लॉवर-२ चे रहस्य
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : सुनील ग्रोव्हरच्या 'सनफ्लॉवर' वेबसिरीजची चर्चा सध्या जोरदार आहे. या सनफ्लॉवरच्या सीजन-२ मध्ये अदा शर्माने (Adah Sharma) काम केलं आहे. तिने या सीजनबाबत माहिती देताना सांगितले की, या सीजनमध्ये मी बार डान्सर बनून सगळ्यांना आश्चर्यकारक धक्का देणार आहे. बार डान्सरची भूमिका ही माझ्यासाठी खूप महत्त्वपूर्ण राहिली आहे. ते या सीजनमध्ये पहायला मिळेल.'

शुक्रवारी या सीजनचा ट्रेलर रिलीज झाला. सोशल मीडियावर हा ट्रेलर ट्रेंडिंगवर आहे. या सीजनमध्ये अभिनेत्री अदा शर्माने एन्ट्री केली आहे. आज तिने एएनआयला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये तिची या सीजनमध्ये काय भूमिका असेल यावर खुलासा केला. तसेच तिने मला या सीजनमध्ये काम करायला मिळालं याबद्दल भारी वाटत असल्याची प्रतिक्रिया देखील दिली. (Adah Sharma)

अदाह शर्माने प्रतिक्रिया देताना सांगितले की, मी या चित्रपटात खूप महत्त्वाची भूमिका बजावत आहे. या सीजनमध्ये मी बार डान्सर म्हणून पहायला मिळेल, पण माझी मूळ भूमिका ही सगळ्यांना शेवटी समजेल. बार डान्सर बनून सगळ्यांना अंधारात ठेवून वेगळच काहीतरी करणार आहे. खूप सिक्रेट अशी माझी भूमिका आहे. या सीजनमध्ये राजने मला कुकींगपासून खून करण्यापर्यंत सगळी मदत केली आहे.
अभिनेता सुनील ग्रोव्हरच्या प्रसिद्ध वेब सीरिज 'सनफ्लॉवर'चा दुसरा सीझन लवकरच येणार आहे. १६ फेब्रुवारी रोजी, निर्मात्यांनी शोचा ट्रेलर रिलीज केला. ट्रेलरवरुन तरी असं दिसत आहे की, हा सीजन मागील सीझनपेक्षा अधिक शक्तिशाली आणि मजेदार ठरेल. खून झाल्यानंतर आरोपीला पकडण्यासाठी रचलेले हे मायाजाळ या स्टोरीमध्ये पहायला मिळेल. या सीजनमुळे अदा शर्मा पुन्हा चर्चेत आली आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news