Social media Nashik | इन्स्टावरील ‘बकासूर’चा माफीनामा | पुढारी

Social media Nashik | इन्स्टावरील 'बकासूर'चा माफीनामा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सोशल मीडियावर गुन्हेगारीस प्रोत्साहन देणाऱ्या पोस्ट टाकणाऱ्या ‘बकासूर’नामक खातेधारकास शहर पोलिसांनी पकडून त्याची चूक लक्षात आणून दिली. त्यानंतर त्याच्याच सोशल मीडिया (Social media) खात्यावरून त्याने कशी चूक केली व इतरांनी ती करू नये, असा व्हिडिओ व्हायरल करून माफी मागितली.

झीरो टॉलरन्स मोहिमेंतर्गत (Zero tolerance campaign) शहर पोलिस गुन्हेगारांसह सोशल मीडियावर (Social media) भाईगिरी करणाऱ्या किंवा त्यास प्रोत्साहन देणाऱ्यांवर लक्ष ठेवले जाते. त्यानुसार इन्स्टाग्रामवर बकासूर या नावे खाते तयार करून एक युवक गुन्हेगार व त्यांच्या कृत्यांना समर्थन करणाऱ्या पोस्ट टाकत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी त्याचा शाेध घेत त्याला तो करत असलेल्या चुकीच्या कृत्यांची माहिती दिली. तसेच गुन्हेगारीला खतपाणी घातल्यास कारवाई होईल, त्याचा स्वत:सह घरच्यांना नाहक त्रास होऊ शकतो, याची जाणीव करून दिली. त्यानंतर त्याच्याच खात्यावरून त्याचा माफीनामा व्हायरल करण्यात आला. या कारवाईमुळे सोशल मीडियावर (Social media) भाईगिरी, दहशत करण्याचा प्रयत्न करणाऱ्या किंवा गुन्हेगारांचे समर्थन करणाऱ्यांना दणका बसला आहे.

बकासुरांनो आम्ही सहज पोहोचू!
शहर पोलिसांनी गुन्हेगारांचे समर्थक, प्रोत्साहन देणाऱ्या इतर ‘बकासूर’ प्रवृत्तीच्या खातेधारकांना अशी चूक न करण्याचा सल्ला दिला आहे. ‘इतर बकासुरांनी नोंद घ्यावी. आम्ही तुमच्यापर्यंत सहज पोहोचू. त्यावेळी अज्ञानपणाचा बहाणा करू नका’ असा सूचक सल्लाही पाेलिसांनी दिला आहे.

Back to top button