हिंदू मंदिराचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते आज उद्घाटन | पुढारी

हिंदू मंदिराचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते आज उद्घाटन

अबुधाबी : वृत्तसंस्था : पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारपासून दोन दिवसांच्या यूएई (संयुक्त अरब अमिरात) दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदी १४ फेब्रुवारी रोजी राजधानी अबुधाबीलगत या मुस्लिम देशातील पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन करतील. मंगळवारी यूएई अध्यक्ष मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांच्यासोबत पंतप्रधान मोदींची द्विपक्षीय बैठक झाली. ‘अहलान मोदी’ (नमस्कार मोदी) हा कार्यक्रम झाला. यूएईमधील मूळ भारतीयांना मोदींनी मार्गदर्शन केले. (PM Modi UAE Hindu Mandir Inauguration)

UAE Hindu Mandir Inauguration : दृष्टिक्षेपात मंदिर

  • 17 एकर जमीन २०१५ मधील पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यात यूएई अध्यक्षांकडून हिंदू मंदिरासाठी दान
  • 2017 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पायाभरणी
  • 700 कोटी रुपये मंदिरावर करण्यात आलेला एकूण खर्च
  • 10 हजार लोक एकाचवेळी पूजापाठ करू शकतील
  • 7 शिखरे अरब अमिरातमधील 7 प्रदेशांचे प्रतिनिधित्व करतात. मंदिरात जगन्नाथ, कार्तिकेश्वर आदींच्या मूर्ती
  • 4 ग्रंथांतील (रामायण, महाभारत, भागवत आणि शिवपुराण) प्रसंगांवर आधारित शिल्पे
  • 1,100 अक्षरधाम मंदिरे जगभरात

Back to top button