Delhi Farmer Protest : ‘चलो दिल्ली’ शेतकऱ्यांच्या मोर्चाने वाढलं टेन्शन; हरियाणाची सीमा सील, इंटरनेट बंद | पुढारी

Delhi Farmer Protest : 'चलो दिल्ली' शेतकऱ्यांच्या मोर्चाने वाढलं टेन्शन; हरियाणाची सीमा सील, इंटरनेट बंद

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या नेतृत्वाखालील हरियाणा सरकारने शनिवारी १३ फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांच्या प्रस्तावित ‘चलो दिल्ली’ मोर्चाच्या पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यांतील मोबाइल इंटरनेट, एसएमएस आणि सर्व डोंगल सेवा १३ फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याची घोषणा केली आहे. (Delhi Farmer Protest)

संयुक्त किसान मोर्चा आणि किसान मजदूर मोर्चासह २०० हून अधिक शेतकरी संघटनांनी १३ फेब्रुवारी (मंगळवार) रोजी ‘चलो दिल्ली’ मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. पिकांसाठी किमान आधारभूत किंमत (MSP) हमी देण्यासाठी कायदा लागू करण्यासह विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारवर दबाव आणणे हा या मोर्चाचा उद्देश आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गाझीपूर सीमेवर बॅरिकेडिंग केले असून अनेक जिल्ह्यांतील मोबाइल इंटरनेट, एसएमएस आणि सर्व डोंगल सेवा १३ फेब्रुवारीपर्यंत निलंबित करण्याची घोषणा केली आहे. अंबाला, कुरुक्षेत्र, कैथल, जिंद, हिस्सार, फतेहाबाद आणि सिरसा या जिल्ह्यांमध्ये सेवा बंद करण्यात आल्या आहेत. (Delhi Farmer Protest)

हरियाणा प्रशासनाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, व्हॉईस कॉल वगळता मोबाइल नेटवर्कवर प्रदान केलेल्या एसएमएस आणि सर्व डोंगल सेवा निलंबित राहतील. हा आदेश रविवारी सकाळी ६ वाजल्यापासून १३ फेब्रुवारी रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत लागू राहील, असे अधिसूचनेमध्ये म्हटले आहे. (Delhi Farmer Protest)

हेही वाचा : 

Back to top button