

पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणुकीत पंजाब राज्यातील सर्व जागा आम आदमी पार्टी स्वबळावर लढवेल. पंजाब आणि चंदीगडमधील सर्व १४ जागा लढविणार आहोत, असे पक्षाचे निमंत्रक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज ( दि.१०) स्पष्ट केले. त्यांनी केलेली घोषणा काँग्रेससाठी धक्का मानला जात आहे.
घरोघरी मोफत रेशन योजना प्रारंभानिमित्त केजरीवाल आज मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासोबत पंजाबमध्ये आले होते. खन्ना येथे आयोजित राज्यस्तरीय कार्यक्रमात केजरीवाल म्हणाले की, दोन वर्षांपूर्वी तुम्ही आशीर्वाद दिला होता. आम्हाला 117 जागांपैकी 92 जागा दिल्या. पंजाबमध्ये तुम्ही इतिहास घडवला. आज मी पुन्हा हात जोडून तुमचे आशीर्वाद मागतो. लोकसभेच्या निवडणुका दोन महिन्यांनी होणार आहेत. पंजाबमध्ये 13 (लोकसभेच्या) जागा आहेत एक चंदीगड आहे. एकूण 14 जागा असतील. येत्या 10-15 दिवसांत आम आदमी पार्टी या सर्व 14 जागांवर आपले उमेदवार जाहीर करेल.
यावेळी केजरीवाल यांनी भगवंत मान यांच्या सरकारचेही कौतुक केले. गेल्या दोन वर्षांत मान सरकारने खूप काम केले आहे. आज जर मी तुम्हाला विचारले की काँग्रेसने इतकी वर्षे राज्य का केले. काँग्रेसने केलेली एक चांगली गोष्ट सांगा. तुम्हाला आठवणार नाही. अकाली दलाने इतकी वर्षे राज्य का केले असे मी तुम्हाला विचारले तर मला सांगा. तुला आठवणार नाही, असेही केजरीवाल म्हणाले.
हेही वाचा :