Pakistan Election Result 2024 : पाकमधील निवडणुकीत इम्रान खान यांचा PTI पक्ष आघाडीवर | पुढारी

Pakistan Election Result 2024 : पाकमधील निवडणुकीत इम्रान खान यांचा PTI पक्ष आघाडीवर

पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तान नॅशनल असेंब्लीच्या निवडणुकीतील २६५ जागांपैकी १२२ हून अधिक जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. यात इम्रान खानच्या पीटीआय पक्षाचा पाठिंबा असलेले अनेक अपक्ष उमेदवार आघाडीवर आहेत. दुपारी ३ वाजेपर्यंत हाती आलेल्या निकालानुसार, इम्रान खान यांच्या पक्षाने ४९ जागा जिंकल्या आहेत. नवाझ शरीफ यांच्या पीएमएल-एन पक्षाने ३९ जागांवर विजय मिळवला आहे. पीटीआय १० जागांनी पुढे आहे. तर बिलावल भुट्टो-झरदारी यांच्या पीपीपी पक्षाने ३० जागांवर आघाडीवर आहे. 

निवडणूक आयोगाच्या वेबसाइटनुसार, २६५ जागांवर झालेल्या निवडणुकीत इम्रानचा पक्ष पीटीआय, पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) आणि पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज (पीएमएल-एन) यांना कडवी टक्कर देत आहे. पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने आतापर्यंत एकूण ५७ जागांवर निकाल जाहीर केले आहेत. यामध्ये पाकिस्तानचे माजी पंतप्रधान शेहबाज शरीफ, त्यांचे भाऊ नवाझ शरीफ यांच्या नेतृत्वाखालील पीएमएल-एन पक्षाला एकूण ३९ जागा मिळाल्या आहेत. तुरुंगात असलेल्या इम्रान खानच्या नेतृत्वाखालील पीटीआय पक्षाचे समर्थन असलेले अनेक अपक्ष उमेदवार आघाडीवर आहेत. यावरुन इम्रान खान यांची लोकप्रियता अद्याप कमी झालेली नाही. त्यांच्या पीटीआय पक्षातील अनेकजण अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. (Pakistan Election Result 2024)

माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांची मुलगी पीएमएल-एन नेत्या मरियम नवाज यांनी लाहोरमधील नॅशनल असेंब्लीची जागा जिंकली आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निकालांनुसार त्यांना जवळपास ८४ हजार मते मिळाली आहेत. शेहबाज शरीफ यांनी पाकिस्तानच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या पंजाब प्रांताची राजधानी लाहोरमधील त्यांची जागा जिंकली आहे. (Pakistan Election Result 2024)

पाकिस्तान गुरुवारी सकाळी ८ वाजता मतदान सुरू झाले आणि संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ते सुरू राहिले. १२ कोटींहून अधिक मतदारांना मतदान करता यावे यासाठी देशभरात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली होती. मतदान संपल्यानंतर मतमोजणी सुरू झाली आणि अनिवार्य एक तासाचा निर्बंध संपल्यानंतर वैयक्तिक मतदान केंद्रांचे निकाल लागले. इम्रान खान यांचा पक्ष पीटीआयचा पाठिंबा असलेल्या काही उमेदवारांनी विजयाचा दावा केला आहे. त्यांनी मतदान केंद्रांमध्ये छेडछाड आणि मतमोजणी जाणूनबुजून थांबविल्याचा आरोपही केला आहे.

पाकिस्तानात गुरुवारी नॅशनल असेंब्लीसाठी मतदान सुरू असताना दहशतवाद्यांनी लज्जा येथे मतदान केंद्राजवळ बॉम्बस्फोट घडवून आणला होता. त्यात सात पोलिसांचा मृत्यू झाला. याखेरीज अन्यत्र विविध ठिकाणी झालेल्या हिंसाचारात दोन बालकांसह ९ जण ठार झाले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून इंटरनेटवरच्या वापरावर बंदी घालण्यात आली होती. तथापि, त्यामुळे लोक आणखी प्रक्षुब्ध झाले आहेत. दरम्यान, माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी तुरुंगातूनच टपालाद्वारे मतदानाचा हक्क बजावला होता. (Pakistan Election Result 2024)

हेही वाचा:

 

Back to top button