काविळीने महिलेसह दोघांचा मृत्यू | पुढारी

काविळीने महिलेसह दोघांचा मृत्यू

कोल्हापूर, टोप ; पुढारी वृत्तसेवा : काविळीने दोन वेगवेगळ्या ठिकाणी महिलेसह तरुणाचा मृत्यू झाला. राबिया मोहम्मद मकानदार (वय 58, रा. ब्रह्मपुरी, जुना बुधवार पेठ, कोल्हापूर) व सुनील ऊर्फ धनाजी महादेव भेंडेकर (35, मौजे वडगाव, ता. हातकणंगले) अशी त्यांची नावे आहेत.

काविळीने त्रास होऊ लागल्याने मकानदार यांना बुधवारी (दि. 7) शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. पहाटे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

मौजे वडगाव येथील सुनील ऊर्फ धनाजी भेंडेकर हा गेल्या काही दिवसांपासून काविळीने आजारी होता. त्याच्यावर स्थानिक डॉक्टरांकडे उपचार सुरू होते. दोन दिवसांपूर्वी त्रास असह्य झाल्याने उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुपारी त्यांचा मृत्यू झाला. सीपीआर पोलिस चौकीमध्ये दोन्हीही घटनांची नोंद झाली आहे. दरम्यान टोप गावात कविळीची साथ नसल्याचे सांगण्यात आले आहे

Back to top button