Washim : पुणे पोलिसांचा वाशीमच्या विविध पत्रकार संघटनेकडून जाहीर निषेध | पुढारी

Washim : पुणे पोलिसांचा वाशीमच्या विविध पत्रकार संघटनेकडून जाहीर निषेध

वाशीम पुढारी वृत्तसेवा : महाविकास आघाडीचे पुणे येथील गोखलेनगर येथे आयोजित आंदोलनाचे वृत्तांकन करणाऱ्या पुढारी न्युजचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौथमल यांना पुणे पोलिसानी धक्काबुक्की करत त्यांच्याकडील कॅमेरा आणि मोबाईल हिसकावून घेत कारवाईची धमकी दिली. पत्रकारांशी आक्षेपार्ह वर्तन करत पोलिसांनी मुजोर वर्तन केले आहे. कॅमेरामनला फरफटत नेऊन पोलीस व्हॅनमध्ये बसविले. कॅमेरामधील सीमकार्ड काढून घेतली. माध्यमांचा गळा घोटण्याचा हा प्रकार होय. पत्रकारांवर अन्याय करणाऱ्या संबंधित पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी वाशिम जिल्ह्यातील विविध पत्रकार संघटने कडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आंदोलन करण्यात आले.(Washim)

यावेळी वाशीम जिल्हा पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष तथा दैनिक पुढारी जिल्हा प्रतिनिधी अजय ढवळे, व्हाईस ऑफ मिडीयाचे कार्यध्यक्ष तथा पुढारी न्युजचे जिल्हा प्रतिनिधी देव इंगोले, श्रमिक पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष अतिश देशमुख, विठ्ठल देशमुख, आकाशवाणीचे जेष्ठ पत्रकार सुनील कांबळे, पत्रकार पंकज गाडेकर, मनोज जयस्वाल, साजन धाबे, राम धनगर, विशाल राऊत, बालाजी ठेंगडे, रुपेश बाजड, नजीर शेख, मनोज जयस्वाल, यांच्यासह शहरातील पत्रकार बांधव उपस्थित होते.

हेही वाचा 

Back to top button