Bihar Politics Updates: 'मी राजीनामा दिला...' नितीशकुमार यांची पहिली प्रतिक्रीया; बिहारमधील 'महायुती' सरकार संपुष्टात | पुढारी

Bihar Politics Updates: 'मी राजीनामा दिला...' नितीशकुमार यांची पहिली प्रतिक्रीया; बिहारमधील 'महायुती' सरकार संपुष्टात

पुढारी ऑनलाईन डेस्क: बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयुचे सर्वेसर्वा नितीशकुमार यांनी रविवारी (दि.२८) सकाळी बिहारचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांच्याकडे राजीनामा सोपवला. यामुळे बिहारमधील ‘ महायुती’ सरकार संपुष्ठात आले. महायुती  सरकारमध्ये नितीशकुमार यांचा जनता दल (युनायटेड), लालूप्रसाद यादव यांचा राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेससह तीन डाव्या पक्षांचा समावेश होता. परंतु नितीशकुमार यांच्या राजीनाम्याने बिहारमधील सरकार बरखास्त झाले आहे. (Bihar Politics Updates)

नितीश कुमार यांच्या जनता दल (युनायटेड) विधिमंडळाची बैठक आज (दि.२८) सकाळी पार पडली. दरम्यान त्यांनी या बैठकीत मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय जाहीर केला. यानुसार त्यांनी बिहार राजभवनात राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्त केला.  बिहारमध्ये नितीशकुमार पुन्हा एकदा भाजपशी हातमिळवणी करत आहेत. त्यामुळे त्यांनी विरोधी पक्षाच्या इंडिया आघाडीला सोडचिठ्ठी दिल्याचे या निर्णयाने स्पष्ट झाले आहे. (Bihar Politics Updates)

सरकारमध्ये सर्व काही ठीक नव्हते, म्हणून निर्णय- नितीशकुमार

यानंतर नितीशकुमार यांनी माध्यमांना पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी म्हटले आहे की, “आज मी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे आणि मी राज्यपालांनाही राज्यातील सरकार विसर्जित करण्यास सांगितले आहे” असे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच ही परिस्थिती उद्भवली कारण बिहार सरकारमध्ये सर्व काही ठीक नव्हते. मी सर्वांची मते मिळत होतो. मी पक्षातील सर्वांचे मत ऐकले आणि त्यानंतर आज राजीनामा देण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे सरकार विसर्जित झाले असे देखील सध्याचे बिहारचे काळजीवाहून मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे. (Bihar Politics Updates)

हेही वाचा:

Back to top button