श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठा दिन : शाळा- महाविद्यालयांना सुटी | पुढारी

श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठा दिन : शाळा- महाविद्यालयांना सुटी

पुणे : अयोध्येतील श्रीराम मंदिरात होणार्‍या श्रीरामलल्ला प्राणप्रतिष्ठा दिनानिमित्त महाराष्ट्रातील शाळा व महाविद्यालयांना 22 जानेवारी रोजी सुटी असणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे सध्या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेतल्या जात आहेत.

22 जानेवारी रोजीसुद्धा काही विषयांच्या परीक्षा नियोजित होत्या. परंतु, या परीक्षा रद्द केल्या जात असल्याचे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. या परीक्षा नंतर कधी होणार याबाबत यथावकाश कळविले जाईल, असेदेखील त्यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा

Back to top button