Weather Update : राज्य गारठले; जळगाव 11.3, पुणे 11.7 अंशांवर

Weather Update : राज्य गारठले; जळगाव 11.3, पुणे 11.7 अंशांवर

पुणे : राज्यात शुक्रवारी जळगावचे तापमान सर्वांत कमी 11.3 तर त्या पाठोपाठ पुणे 11.7 अंशांवर होते. दरम्यान, उत्तर भारतात थंडीची लाट 23 जानेवारी कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. काश्मीर, पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशपर्यंत पारा 3 ते 5 अंशांच्या खाली आला आहे.

शुक्रवारी राजस्थानातील बिकानेरमध्ये 2.4 अंश सेल्सिअस इतके कमी तापमान होते. महाराष्ट्रही गारठला असून, सरासरी किमान तापमान 11 ते 13 अंशांवर खाली आले आहे. हा कडाका 23 जानेवारीपर्यंत राहील, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

हेही वाचा

logo
Pudhari News
pudhari.news