NIMA Nashik : ‘निमा’कडून मनपा आयुक्तांना स्मरणपत्र, ‘एमआयडीसी’तील समस्यांचा प्रश्न | पुढारी

NIMA Nashik : 'निमा'कडून मनपा आयुक्तांना स्मरणपत्र, 'एमआयडीसी'तील समस्यांचा प्रश्न

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- अंबड व सातपूर औद्योगिक वसाहतीतील महापालिकेशी निगडित प्रलंबित प्रश्नांवर स्वतंत्र बैठक घेणार असल्याचे मनपा आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी जिल्हा उद्योगमित्र अर्थात ‘झूम’च्या बैठकीत स्पष्ट केले होते. मात्र, अजूनही बैठकीला मुहूर्त लागत नसल्याने नाशिक इंडस्ट्रिज अॅण्ड मॅनुफॅक्चरर्स असोसिएशनने त्यांना निवेदनवजा स्मरणपत्र पाठविले आहे. (NIMA Nashik)

अंबड व सातपूर औद्योगिक क्षेत्रात अनेक मूलभूत प्रश्न प्रलंबित असून, महापालिकेच्या माध्यमातून ते प्रश्न सोडविणे अपेक्षित आहे. मात्र, वर्षानुवर्षांपासून त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा मुद्दा जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा उद्योग मित्रच्या बैठकीत उद्योजकांनी उपस्थित केला होता. त्यावर मनपा आयुक्त डॉ. करंजकर यांनी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात स्वतंत्र बैठक घेऊन त्यावर तोडगा काढण्याचे उद्योजकांना आश्वासित केले होते. मात्र, अद्याप बैठकीबाबतच्या कुठल्याच सूचना प्राप्त न झाल्याने निमाच्या माध्यमातून आयुक्तांना निवेदनवजा स्मरणपत्र दिले गेले आहे. त्यामध्ये निमा पदाधिकाऱ्यांसमवेत लवकरात लवकर बैठक घेऊन प्रश्नांवर तोडगा काढावा, अशी विनंती करण्यात आली आहे. (NIMA Nashik)

बैठकीला फेब्रुवारी उजाडणार?

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यामुळे संपूर्ण मनपा प्रशासन त्याकामी व्यस्त होते. तसेच २२ जानेवारी रोजी अयोध्येतील श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा तसेच २७, २८ जानेवारी रोजी राज्यस्तरीय सहकार परिषद असल्याने, या महिन्यात बैठकीला मुहूर्त लागण्याची चिन्ह धूसर असल्याचे मनपा वर्तुळातून सांगण्यात येत आहे.

हेही वाचा :

Back to top button