ब्रिटन मध्ये गायीच्या शेणापासून वीजनिर्मिती | पुढारी

ब्रिटन मध्ये गायीच्या शेणापासून वीजनिर्मिती

लंडन : ब्रिटन मधील शेतकर्‍यांनी गायीच्या शेणापासून वीजनिर्मिती करण्याचा पर्याय विकसित केला आहे. शेतकर्‍यांच्या एका समूहाने गायीच्या शेणापासून अशी भुकटी तयार केली आहे ज्यापासून बॅटरीची निर्मिती केली जाऊ शकते.

गायीच्या एक किलो शेणापासून इतकी वीज तयार होते की तिच्या सहाय्याने सतत पाच तास व्हॅक्यूम क्लिनर चालवता येऊ शकेल. ब्रिटन च्या आर्ला डेअरीकडून अशी वीजनिर्मिती करण्यात येत आहे.

डेअरीने गायीच्या शेणाची पावडर बनवून त्यापासून अशा बॅटरी तयार केल्या आहेत. त्यांना ‘काऊ पॅटरी’ असे नाव दिले आहे. अशा ‘एए’ साईजच्या बॅटरीजच्या सहाय्याने सुमारे साडेतीन तासांपर्यंत कपडेही इस्त्री केले जाऊ शकतात. याबाबत बॅटरी एक्सपर्ट जीपी बॅटरीजने दावा केला आहे की एका गायीच्या शेणापासून तीन घरांना वर्षभर सहजपणे वीज मिळू शकते.

याशिवाय केवळ एक किलो शेणापासून 3.75 किलोवॅट वीज तयार केली जाऊ शकते. जर 4,60,000 गायींच्या शेणापासून वीज बनवली तर 12 लाख घरांमध्ये वीजपुरवठा करणे शक्य होईल. आर्ला डेअरीतील बहुतांश कामांसाठी शेणापासून निर्माण केलेल्या विजेचाच वापर केला जातो.

Back to top button