Nagpur News : स्त्री शक्ती संवाद यात्रेसाठी किशोरी पेडणेकर विदर्भात दाखल | पुढारी

Nagpur News : स्त्री शक्ती संवाद यात्रेसाठी किशोरी पेडणेकर विदर्भात दाखल

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : स्त्रीशक्ती संवाद यात्रेच्या निमित्ताने रश्मी ठाकरे महिला शक्ती एकवटणार आहेत. यासाठी आज (दि.१६) मुंबईच्या माजी महापौर, उपनेत्या किशोरी पेडणेकर, रंजना नेवाळकर इतर पदाधिकाऱ्यांसह विदर्भात दाखल झाले आहेत. विमानतळावर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. Nagpur News

शिवसेना खासदार कृपाल तुमाने शिंदे गटात गेले असून भाजपने या जागेवर दावा केला आहे. दुसरीकडे महायुतीत काँग्रेस, शिवसेना अशी रस्सीखेच आहे. १७ व १८ फेब्रुवारीला प्रत्येकी चार विधानसभा क्षेत्रात ही स्त्री शक्ती संवाद यात्रा जाणार आहे. एकंदरीत शिंदे गट ठाकरे गटातही रामटेकसाठी प्रतिष्ठेची लढाई आहे. Nagpur News

पेडणेकर म्हणाल्या, महिलांचा जोश पाहून तुम्हाला यात्रेची तयारी दिसलीच असेल, स्त्री संवाद यात्रा महाराष्ट्रात काढण्यात येत आहे. महाराष्ट्रात भूतकाळातील प्रश्न काढले जात आहेत. वर्तमान काय आहे? या वर्तमानाला शोधायला, भविष्याला घडवायला, हा स्त्री शक्तीचा संवाद आहे. महायुतीत जागावाटप करणारे आमचे पक्षप्रमुख आहेत. त्यांचा फॉम्युला ठरेल तेव्हा तो समोर येणारच आहे. जागावाटप पेक्षा जे जागेवर आहे, त्यांना कशी चालना द्यायची, जे निष्ठेने थांबले, त्यांच्यासोबत संवाद करून वर्तमानातील काही प्रश्न आहेत, यावर विचार करायचा आहे. भूतकाळ हवाचं. मात्र, वर्तमानही मजबूत हवा, आम्हाला कोणाला जागा दाखवायची गरज नाही. जागा जनताच दाखवणार, आम्ही फक्त आमच्या बरोबर असलेल्यांना त्यांच्यामध्ये जी एनर्जी आहे, त्या एनर्जीला पॉवर देण्याच काम करतो आहे.

चांदा ते बांदा म्हटले जाते, तसे देशाचे मध्यस्थान नागपूर आहे. म्हणून आम्ही नागपूरची निवड केली. इथून आम्ही मुंबईपर्यंत पोहोचू, सगळ्या लोकसभेमध्ये आणि विधानसभा क्षेत्रामध्ये आम्ही जाणार आहोत. निकाल काय लागला? यासंदर्भात बोलताना त्यांच्या स्क्रिप्ट ठरल्या आहेत. मात्र, एक स्क्रिप्ट जनतेमध्ये आहे. हे त्यांनी विसरू नये, असे पेडणेकर म्हणाल्या.

हेही वाचा 

Back to top button