नागपूर : रामदेव बाबा यांच्या वक्तव्याच्या विरोधात ओबीसी समाज रस्त्यावर | पुढारी

नागपूर : रामदेव बाबा यांच्या वक्तव्याच्या विरोधात ओबीसी समाज रस्त्यावर

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : योगगुरू रामदेव बाबा यांनी ओबीसी समाजाबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या विरोधात आज (दि. १४) नागपुरातील ओबीसी संघटना संतप्त झाल्या. रस्त्यावर उतरून रामदेव बाबांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. 80 टक्के ओबीसी समाज तुमची उत्पादने वापरत असल्यामुळे तुम्ही मालामाल झालात, कोट्यावधी रुपये कमावले, आता मी ओबीसी नाही, ओबीसी की ऐसीतैसी म्हणता.. तुम्ही योगगुरू रावणबाबा आहात असा आरोप आंदोलकामार्फत यावेळी करण्यात आला. नागपुरातील जगनाडे चौकात राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले. परमेश्वर राऊत, नागपूर शहर अध्यक्ष ओबीसी महासंघ सुभाष घाटे, राष्ट्रीय युवा अध्यक्ष यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले.

Back to top button