Murder In Mahim फेम शिवानी रघुवंशीच्या ग्लॅमरस रुपापुढे भल्या भल्या अभिनेत्रीही फिक्या

शिवानी रघुवंशी
शिवानी रघुवंशी
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : मर्डर इन माहिमची पोलिस अधिकारी शिनावी रघुवंशी हि रिअल लाईफमध्ये ग्लॅमरस आहे. मेड इन हेवनमध्ये शिवानी रघुवंशी हिने आपल्या अभिनयाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. या सीरीजमध्ये तिने जसप्रीत कौरची भूमिका साकारली होती. अनेक लोकांनी या ३२ वर्षीय अभिनेत्रीला स्टारकिड्सपेक्षा उत्तम अभिनय असल्याचे म्हटले आहे.

शिवानी रघुवंशीचा जन्म १९ जस, १९९१ रोजी उत्तर प्रेदशमध्ये झाला. शिवांगी रघुवंशीने आपल्या करिअरची सुरुवात कनु बहलचा चित्रपट तितलीमधून केली. ती या चित्रपटात नीलूच्या भूमिकेत दिसली. यामध्ये रणवीर शोरे, शशांक अरोरा आणि अमिता सियाल मुख्य भूमिकेत दिसली होती.

चित्रपट तितली मध्ये तिने मुख्य भूमिका साकारली होती. अनेक टीव्ही जाहिरातींमध्येही तिने काम केले आहे. रात अकेली है, देवी, बाते, जान द जिगर, अंग्रेजी में कहते है, शॉकर्स या लघुपटांमध्येही तिने काम केले आहे. २२ व्या स्क्रीन अवॉर्ड्समध्ये मोस्ट प्रॉमिसिंग न्यूकमर फिमेल पुरस्काराने तिला सन्मानित करणायात आले होते.

शिवानी लहानपणापासूनच डॉक्टर बनण्याची इच्छा होती. तथापि, जेव्हा तिने तिच्या कुटुंबासह देवदास (२००२) पाहिला तेव्हा चित्रपट सृष्टीच्या गुंतागुंतीबद्दलचे तिचे आकर्षण वाढले. या कुतूहलाने तिला चित्रपटात जाण्याचे स्वप्न पाहण्याची प्रेरणा दिली. आईच्या प्रोत्साहनामुळे तिने दिल्ली विद्यापीठातून बॉटनी ऑनर्समध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण केले.

सोबतचं एका जाहिरातीच्या ऑडिशनसाठी संयोजकांनी तिला बोलावलं आणि तिच्या परिवर्तनाच्या प्रवासाची सुरुवात झाली. तिचा अभिनयाचा प्रवास व्होडाफोनच्या टीव्ही जाहिरातीपासून सुरू झाला होता. शिवानीला शुभम रघुवंशी नावाचा भाऊ आणि एक लहान बहीण आहे.

हेही वाचा-

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news