Market Update : थंडीमुळे गवती चहाला वाढली मागणी | पुढारी

Market Update : थंडीमुळे गवती चहाला वाढली मागणी

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : शहरात थंडीचा कडाका वाढू लागला असल्याने गवती चहाला मागणी वाढली आहे. तर पालेभाज्या स्वस्त असल्याने दर सामान्याच्या आवाक्यात आहेत. लसूण, गवार आणि भेंडीचे दर तेजीतच आहेत. शहरातील मोशी उपबाजार, चिंचवड, आकुर्डी तसेच पिंपरी येथील लाल बहादुर शास्त्री भाजी मंडईमधील किरकोळ बाजारात गवती चहाला मागणी वाढल्याने आवक देखील वाढली आहे. तर लसणाचे दर प्रतिकिलो 300 रूपयाहून अधिक तर गवार, भेंडीचे दर 100 रूपयाहून अधिक आहेत. कोथिंबीर, मेथी, पालक आदींचे दर प्रत्येकी 15 ते 20 रूपये प्रतिजुडी आहेत.

मोशी उपबाजारातील घाऊक दर :  (प्रतिकिलो)
भेंडी 65 ते 70, गवार 70 ते 90, गाजर, 25 ते 30, वांगी 50 ते 60, शेवगा 70 ते 80, काकडी 15 ते 20, कांदा 15 ते 20, बटाटा 12 ते 15, टोमॅटो 15 ते 20, आले 65 ते 70, लसूण 150 ते 160, मटार 30 ते 35 रूपये प्रतिकिलो दराने विक्री झाली.

मोशी उपबाजारातील आवक : (क्विंटल)
कांदा 681, बटाटा 870, आले 75, गाजर 162, गवार 11, शेवगा 22, हिरवी मिरची 178, टोमॅटो 437, काकडी 170, भेंडी 62 क्विंटल एवढी आवक झाली आहे.

मोशी उपबाजारात पालेभाज्यांच्या एकूण 56950 गड्डी, फळे 443 क्विंटल आणि फळ भाज्यांची आवक 3970 क्विंटल एवढी आवक झाली.

पिंपरी मंडईतील पालेभाज्यांचे

किरकोळ भाव
पालेभाज्या दर (प्रति जुळी)
मेथी 15 ते 20
कोथिंबीर 15 ते 20
कांदापात 25 ते 30
शेपू 15
पुदिना 10
मुळा 15
चुका 10
पालक 15
चवळी 15

फळभाज्यांचे किलोचे भाव (किरकोळ)
कांदा 20 ते 40
कांदा (जुना) 60 ते 70
बटाटा 25 ते 30
आले 130
लसूण 300 ते 350
फ्लॉवर 50
कोबी 50
काकडी 40
शिमला मिरची 60
शेवगा 150 ते 160
भेंडी 100 ते 120
टोमॅटो 40 ते 50
सुरती गवार 110
गावरान गवार 100 ते 110
दोडका 80
लाल भोपळा 60 ते 70
कारली 60
मटार 40 ते 50
वांगी 100
भरीताची वांगी 100
तोंडली 60
पडवळ 60
हिरवी मिरची 70
साधी मिरची 100 ते 120
वाल 80
राजमा 120
श्रावणी घेवडा 120
पापळी 80
बीट 40
गाजर 40

Back to top button