Nashik News : मनमाडच्या पेट्रोल-डिजेल टॅंकर चालकांचा संप अखेर मागे | पुढारी

Nashik News : मनमाडच्या पेट्रोल-डिजेल टॅंकर चालकांचा संप अखेर मागे

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क;  नवीन मोटार वाहन कायद्याविरोधात मनमाडच्या इंधन कंपन्यांमधून धावणाऱ्या टॅंकर व ट्रकचालंकानी पुकारलेला संप मागे घेतला आहे. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या शिष्टाईनंतर हा संप मागे घेण्यात आला आहे.

टॅंकर चालकांच्या संपामुळे जिल्ह्यातील पेट्रोल पंपांना होणारा इंधन पुरवठा विस्कळीत झाला आहे. पेट्रोल पंपावर नागरिकांनी मोठमोठ्या रांगा लावल्या आहेत. पेट्रोल उपलब्ध नसल्याने अनेक पेट्रोलपंप बंद आहेत. त्यासाठी संप मागे घेतला जावा म्हणून प्रयत्न सुरु होते. त्यासाठी आज जिल्हाधिकारी जलज शर्मा हे मनमाड येथे टॅंकर चालकांची मनधरणी करण्यासाठी गेले होते. पेट्रोल आणि डिझेल ही जीवनावश्यक बाब असून संप मागे घेण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केल्यानंतर त्यांच्या मागणीला यश आले. यावेळी टँकर चालकांनी संपातून माघार घेण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे आता मनमाड डेपोतून टँकर रवाना होणार आहे.

काय आहे नवीन कायदा?
केंद्र शासनाने नुकताच भारतीय न्याय संहिता 2023 कायदा लागू केला असून त्यात अपघातानंतर  ट्रकचालक घटनास्थळावरून पळून गेल्यास 10 वर्षे कारावास आणि 5 लाख रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे. या कायद्याविरुद्ध टॅंकर व ट्रकचालकांनी संप पुकारला आहे. राज्यात काही ठिकाणी संप मागे घेण्यात आला आहे तर बहुतांश ठिकाणी संप सुरु आहे.

हेही वाचा :

Back to top button