माेठी बातमी : कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण | पुढारी

माेठी बातमी : कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण

पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्‍याचे कृषीमंत्री धनजंय मुंडे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती आज (दि.२४) समोर आली आहे. प्रकृतीच्या तक्रारीमुळे ते रूग्णालयात गेले हाेते. तेथे त्यांच्या काही चाचण्या करण्यात आल्या. यावेळी मुंडे यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. त्यामुळे धनजंय मुंडे यांच्यावर त्यांच्या पुण्यातील निवासस्थानीच उपचार सुरू आहेत. यापूर्वी त्यांना दोनवेळा कोरोनाची लागण झाली होती. (Dhanjay Munde infected by Corona)

दिवसेंदिवस राज्यासह देशातील कोरोना संकट पुन्हा एकदा गडद होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यातील परस्थितीचा आढावा घेतल. यावेळी या बैठकीच्या माध्यमातून कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी महापालिकांना सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. (Dhanjay Munde infected by Corona)

कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी कोरोनासाठी राखीव बेड, मास्क, पीपीई किट, ऑक्सिजन व्यवस्था, जम्बो सिलिंडर्स तसेच औषधसाठ्याचा आढावा घेत सर्व सज्जतेचे आदेश सरकारने दिले आहेत. सर्दी, ताप, डोकेदुखी, घसा खवखवणे यांसारखी लक्षणे आढळल्यास अशा संशयित रुग्णांची कोरोना टेस्ट करण्याच्या सूचना वैद्यकीय विभागाला सरकारकडून देण्यात आल्या आहेत. शुक्रवारपासून कोरोना लक्षणे असलेल्या संशयित रुग्णांच्या चाचण्यांना सुरुवात होणार आहे. यासाठी बिटको रुग्णालयातील मॉलिक्युलर लॅबही सुरू करण्याच्या सूचना या बैठकीदरम्यान देण्यात आल्या आहेत. (Dhanjay Munde infected by Corona)

अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाईची निर्देश

कोरोनाबाबत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चुकीचे संदेश पसरवले जात आहेत. त्यामुळे कोरोनाच्या नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये जनजागृती केली जाणार आहे. खोटे संदेश पसरवणाऱ्यांवर थेट कारवाई करण्याचे निर्देशही यंत्रणेला दिल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा:

Back to top button