अमरावती: धामणगावचा तरुण कोरोनाग्रस्त, आठ महिन्यांत पहिल्या रुग्णाची नोंद | पुढारी

अमरावती: धामणगावचा तरुण कोरोनाग्रस्त, आठ महिन्यांत पहिल्या रुग्णाची नोंद

अमरावती, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात तब्बल आठ महिन्यानंतर एका कोरोनाग्रस्ताची नोंद झालेली आहे. धामणगाव येथील २१ वर्षीय तरुण येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल होता. त्याचा अहवाल शनिवारी पॉझिटिव्ह आला. त्यामुळे आता जिल्ह्यात ५ मे २०२३ नंतर पहिल्यांदा कोरोना संक्रमितांची नोंद झाली आहे.हा नमुना आता जिनोम सिक्वेसिंगसाठी पाठविण्यात येणार आहे. Amravati Corona Update

कोरोनाची लागण झालेला धामणगाव तालुक्यातील हा रुग्ण आहे. अन्य आजारासाठी तो सुपर स्पेशलिटी रुग्णालयामध्ये दाखल होता. संक्रमित झाल्यानंतर त्याला कोरोना रुग्णांसाठी असलेल्या वॉर्डात उपचारार्थ ठेवण्यात आलेले आहे. त्याची प्रवासाची पार्श्वभूमी नसली तरी त्याच्या संपर्कातील लोकांचे नमुने आता आरोग्य विभागकडून घेण्यात येणार आहेत. Amravati Corona Update

जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेमार्फत एकूण नऊ नमुने तपासणीला पाठविण्यात आले होते. त्यामध्ये एक नमुना पॉझिटिव्ह नोंदविला आहे. हा नमुना आता जिनोम सिक्वेसिंगसाठी पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर हा कोणता व्हेरिएंट आहे, याची माहिती मिळणार असल्याची माहिती विद्यापीठ स्थित कोरोनो टेस्टिंग लॅबचे समन्वयक डाॅ.प्रशांत ठाकरे यांनी दिली.

दरम्यान टेस्टिंग वाढविण्याच्या सूचना आरोग्य विभागाला देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टिकोनातून खबरदारी बाळगावी असे आवाहनही जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

हेही वाचा 

Back to top button