Credo Brands Marketing IPO | मुफ्ती जीन्स कंपनीचा आयपीओ १९ डिसेंबरला सबस्क्रिप्शनसाठी होणार खुला, जाणून घ्या त्याचा Price Band | पुढारी

Credo Brands Marketing IPO | मुफ्ती जीन्स कंपनीचा आयपीओ १९ डिसेंबरला सबस्क्रिप्शनसाठी होणार खुला, जाणून घ्या त्याचा Price Band

मुंबई; पुढारी वृ्त्तसेवा : मुंबई स्थित क्रेडो ब्रँड मार्केटिंग लिमिटेड कंपनीने (Credo Brands Marketing IPO Price) त्यांच्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफर म्हणजेच आयपीओसाठी प्रति इक्विटी शेअर २६६ ते २८० रूपये असा प्राइस बँड निश्चित केला आहे. या IPO चे सब्स्क्रिप्शन १९ डिसेंबर २०२३ रोजी सुरु होईल आणि २१ डिसेंबर २०२३ रोजी बंद होईल. गुंतवणूकदार किमान ५३ इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर ५३ इक्विटी शेअर्सच्या पटीत बोली लावू शकतात.

संबंधित बातम्या : 

फ्लोअर प्राइस इक्विटी शेअर्सच्या दर्शनी मूल्याच्या १३३ पट आहे आणि कॅप किंमत इक्विटी शेअर्सच्या दर्शनी मूल्याच्या १४० पट आहे. प्रति इक्विटी शेअर्स २ रूपयांच्या दर्शनी मूल्याची ऑफर संपूर्णपणे १,९६,३४,९६० इक्विटी शेअर्स पर्यंतच्या विक्रीची ऑफर आहे. कमल खुशलानी यांनी २५ वर्षांपूर्वी पुरूषांच्या पोशाखांना पुन्हा परिभाषित करण्याच्या उद्देशाने ‘मुफ्ती’ हा ब्रँड लॉन्च केला. ग्राहक त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंगांसाठी अर्थपूर्ण वॉर्डरोब सोल्यूशन प्रदान करण्यावर विश्वास ठेवतो. आमच्या उत्पादनांच्या ऑफरमध्ये शर्ट्सपासून टी-शर्ट्सपर्यंत जीन्स ते चिनोपर्यंतचे, जे वर्षभराच्या कपड्यांना पूर्ण करते. सध्या सुरू असलेल्या फॅशन ट्रेंडशी तंतोतंत जुळवून उत्पादने तरुणाईसाठी डिझाइन केलेली आहेत. (Credo Brands Marketing IPO Price)

संबंधित बातम्या

मुफ्तींच्या उत्पादनांचे मिश्रण गेल्या अनेक वर्षांत लक्षणीयरित्या विकसित झाले आहे. ज्यामध्ये फक्त शर्ट आणि ट्राउझर्सपासून ते टी-शर्ट, स्वेटशर्ट, जीन्स, कार्गो, चिनोज, जॅकेट, ब्लेझर आणि आरामशीर सुट्टीच्या कॅज्युअलमध्ये दैनंदिन कॅज्युअल्ससह अनेक उत्पादनांचा समावेश आहे. आजच्या तारखेनुसार शहरी कॅज्युअल, पार्टीचे कपडे आणि अनेक क्रीडा प्रकार आहेत. (Credo Brands Marketing IPO Price)

उत्पादने संपूर्ण भारतातील मल्टीचॅनल वितरण नेटवर्कद्वारे उपलब्ध आहेत, जी आम्ही गेल्या काही वर्षांमध्ये तयार केली आहे. ज्यात त्याचे खास ब्रँड आउटलेट्स (EBOs), मोठे फॉरमॅट स्टोअर्स (LFSs) आणि मल्टी-ब्रँड आउटलेट्स (MBOs), यांचा समावेश आहे. तसेच वेबसाइट आणि इतर ई-कॉमर्स मार्केटप्लेसचा समावेश असलेले ऑनलाइन चॅनेलही आहेत. ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत, 404 EBOs, 71 LFS आणि १,३३२ MBOs असलेल्या १,८०७ टचपॉइंट्सद्वारे संपूर्ण भारतामध्ये त्याची उपस्थिती आहे. त्याची पोहोच मोठ्या महानगरांपासून टियर-३ शहरांपर्यंत विस्तारलेली असून ५९१ शहरांमध्ये उपस्थिती आहे.

मुंबई स्थित फॅशन रिटेलरने २०१४ मध्ये ‘Muftisphere’ हा ग्राहक निष्ठा कार्यक्रम सुरू केला, ज्यामुळे त्यांच्या ग्राहकांना ब्रँडच्या खरेदीसाठी फायदे मिळावेत ज्यामुळे ब्रँडशी त्यांची जवळीक वाढेल. १ नोव्हेंबर २०२३ पर्यंत त्याच्या इंस्टाग्राम पृष्ठावर त्याचे १३७,००० अनुयायी त्याच्या फेसबुक पृष्ठावर ३.४० दशलक्ष अनुयायी आणि युट्यूब चॅनेलवर १५,२०० सदस्य होते.

डॅम कॅपिटल ॲडव्हायझर्स लिमिटेड, आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड, कीनोट फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड हे बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत आणि लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड हे ऑफरचे रजिस्ट्रार आहेत. इक्विटी शेअर्स बीएसई आणि एनएसईवर सूचीबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे.

हेही वाचा : 

 

Back to top button