परभणी ; आयशर ट्रकला धडक देत ट्रक पुलावरून कोसळला; दोनजण जखमी | पुढारी

परभणी ; आयशर ट्रकला धडक देत ट्रक पुलावरून कोसळला; दोनजण जखमी

चारठाणा; (परभणी) ; पुढारी वृत्‍तसेवा चारठाणा येथील चौथ्या पुलाजवळ ट्रकने आयशरला मागून धडक दिली. या अपघातात ट्रक पुलावरून खाली कोसळला. या अपघातात ट्रक मधील दोघेजण गंभीर जखमी झाले. संभाजीनगर-नांदेड राज्य महामार्गावरील चारठाणा येथील चौथ्या पुलाजवळ आज (शनिवार) सकाळी साडेसहा वाजता जालण्याहून नांदेडकडे जाणाऱ्या ट्रकने आयशरला मागून ठोकर मारली. यावेळी ट्रक पुलाचा कठडा तोडून पुलावरून खाली कोसळला. या अपघातात दोनजण जखमी झाल्याची घटना घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, संभाजीनगर-नांदेड राज्य महामार्गावरील चारठाणा येथील चौथ्या पुलाजवळ जालन्याहून नांदेडकडे लाकडे घेऊन जाणाऱ्या ट्रक क्रमांक ए पी 16 टी एफ 6345 ने जालन्याहून परभणीकडे जाणार्‍या आयशर क्रमांक एम एच 15 जी व्ही 6267 ला मागून जोराची धडक दिली. यानंतर हा ट्रक पुलाचा कठडा तोडून पुलाखाली पडला. असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी गायकवाड जमदार एम के कुलकर्णी आर डी गिराम आदींनी तात्काळ जाऊन पलटी झालेल्या ट्रक मधून ड्रायव्हर कृष्णा सत्यनारायण (वय 48) राहणार पालकोंडा आंध्र प्रदेश यास बाहेर काढले.

दरम्यान ड्रायव्हर कृष्ण सत्यनारायण व किन्नर यामो नागराज या दोघांना जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, परंतु ड्रायव्हर कृष्णा सत्यनारायण यांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे या दोघांना जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करून परभणी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

ट्रक पलटी झाल्यानंतर ट्रकच्या केबिनमध्ये ड्रायव्हर कृष्णा सत्यनारायण हे अडकलेल्या अवस्थेत पडून होते. त्याचे दोन्ही पाय निकामी झाले. त्‍या चालकास सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी गायकवाड, एम के कुलकर्णी, आर डी गिराम, आ मेर काजी, शाबुद्दीन काजी आदींनी यास बाहेर काढून वाचविले.

हेही वाचा : .

Back to top button