Houthi group strikes | हुथी बंडखोरांची लाल समुद्रात दादागिरी; लायबेरियन जहाजांवर हल्ला करत दमदाटी | पुढारी

Houthi group strikes | हुथी बंडखोरांची लाल समुद्रात दादागिरी; लायबेरियन जहाजांवर हल्ला करत दमदाटी

पुढारी ऑनलाईन डेस्क : येमेनच्या हुथी बंडखोरांनी लाल समुद्रातील जहाजांवर पुन्हा हल्ला चढवला. हुथी बंडखोरांनी लाल समुद्राच्या कॉरिडॉरमधील दोन लायबेरियन जहाजांवर धडक दिली. तसेच एका जहाजावर बॅलेस्टिक बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागलले.  ही दोन्ही जहाजे लाल समुद्राच्या दक्षिणेकडील भागातून उत्तरेकडे प्रवास करत होते. दरम्यान, लायबेरियनचा झेंडा असलेल्या दोन मालवाहतूक जहाजांवर हुथी बंडखोरांनी हल्ला केला. हुथी बंडखोरांनी लायबेरियन जहाजांना दमदाटी करत वळसा घालून दक्षिणेकडे जाण्यास भाग पाडले. असा दावा अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने  शनिवारी (दि.१६) केलेल्या X पोस्टवरून केला आहे.  या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे. (Houthi group strikes)

येमेनमधील हुथी बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या भागातून लाल समुद्रातील दोन मालवाहू जहाजावर अचानक हल्ला चढवला. लाल समुद्रातील बाब अल-मंदेब सामुद्रधुनीजवळ लायबेरियन ध्वजांकित मालवाहू जहाजावर बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागण्यात आले. यामध्ये मालवाहू जहाजांना आग लागल्याचे जहाजांवरील क्रू ने म्हटले आहे. अमेरिकेच्या संरक्षण अधिकाऱ्याने या संदर्भातील माहिती देताना सांगितले की, या जहाजाची ओळख MSC पॅलेटियम-३ असे करण्यात आली आहे. परंतु यामध्ये कोणीही जखमी झाले नसल्याचे ते म्हणाले. (Houthi group strikes)

हुथी बंडखोरांच्या हल्ल्याने आंतरराष्ट्रीय शिपिंगला धोका

लाल समुद्रात शुक्रवारी १५ डिसेंबर दरम्यान हुथी बंडखोरांनी तीन जहाजांवर हल्ला केला. हल्ला झालेल्या तीनपैकी कोणत्याही जहाजावर कोणतीही दुखापत झालेली नाही. परंतु लाल समुद्रात पुन्ही हुथी बंडखोरांनी हल्ला केला आहे. हुथींच्या या दहशतावादी कृत्यांमुळे आंतरराष्ट्रीय शिपिंगला मोठ्या धोका निर्माण झाला असल्याचे यूएस सेंट्रल कमांडने X अकाऊंटवरून दिलेल्या माहितीत स्पष्ट केले आहे.

हेही वाचा:

 

Back to top button